For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur : शरद पवारांच्या बैठकीला शहराध्यक्ष गैरहजर; पक्षकार्यकर्त्यांकडून खरटमल यांना जाब

06:41 PM Oct 29, 2025 IST | NEETA POTDAR
solapur   शरद पवारांच्या बैठकीला शहराध्यक्ष गैरहजर  पक्षकार्यकर्त्यांकडून खरटमल यांना जाब
Advertisement

          शरद पवारांच्या बैठकीला भाजप कार्यकर्त्याला पाठवणारे शहराध्यक्ष चर्चेत

Advertisement

सोलापूर : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीला स्वतः न जाता सोलापूर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी चक्क भाजप कार्यकर्त्याला पाठवले. यामुळे संतप्त झालेल्या जुन्या निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खरटमल यांच्या कार्यालयात धडक देऊन त्याचा जाब विचारला.

शरदचंद्र पवार यांनी मंगळवारी मुंबई येथे सोलापूर शहर व जिल्हा राष्ट्रवादीची बैठक बोलावली होती. जिल्हाध्यक्ष, शहराध्य तसेच सर्व लोकप्रतिनिधी यांच्यासह काही निवडक ज्येष्ठ नेत्यांना बैठकीचे निमंत्रण होते. शहरातून ज्येष्ठ नेते महेश गादेकर, भारत जाधव आणि अॅड यू एन. बेरिया उपस्थित होते. या बैठकीस शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी दांडी मारली. स्वतः शहराध्यक्ष खरटमल बैठकीला गेले नाहीत, परंतु त्यांचा प्रतिनिधी म्हणून भाजप कार्यकर्ता महेश गाडेकर याला पाठवले. त्यांच्या या प्रतापाने राष्ट्रवादीचे निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्ते चांगलेच मडकले. बुधवारी सायंकाळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खरटमल यांना याचा जाब विचारला. त्यावर खरटमल यांनी उलट उत्तर देत आपल्याला काहीच फरक पडत नसल्याचे सांगितले.

Advertisement

महेश गाडेकर हा कुठल्या पक्षाचा आहे याचे मला काही देणे घेणे नाही. तो माझ कार्यकर्ता आहे, त्यामुळे मी त्याला पाठवले असे उत्तर खरटमल यांनी दिल्याचे कार्यकर्ते म्हणाले. पक्षाने कधीही बैठक बोलावल्यावर मी - जायला रिकामा नाही. मी बिझनेस मॅन आहे. त्यामुळे मी बैठकीला गेलो नाही असे त्यांनी सांगितल्याचे समजते. यामुळे जुन्या व पवारनिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

पवार साहेबांनी बोलावलेल्या बैठकीला आपल्याला जाता येत नसेल तर शहराध्यक्ष म्हणून काम का करत आहात असा जाबही विचारण्यात आला. शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या या कारनाम्यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात एकच खळबळ उडाली आहे.

Advertisement
Tags :

.