For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Pandharpur News : पंढरपुरात शहर पोलिसांची 105 वाहनांवर कारवाई : 57हजारांचा दंड वसूल

07:03 PM Feb 03, 2026 IST | NEETA POTDAR
pandharpur news   पंढरपुरात शहर पोलिसांची 105 वाहनांवर कारवाई   57हजारांचा दंड वसूल
Advertisement

                               पंढरपूर पोलिसांची विशेष वाहतूक मोहीम

Advertisement

पंढरपूर : वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर पंढरपूर शहर पोलिसांनी रविवारी विशेष मोहीम राबवली. यामध्ये १०५ वाहन चालकांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करून ५७ हजार ९०० रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांनी दिली.

पंढरपूर शहरात श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी दररोज मोठ्या प्रमाणात भाविक येतात. तसेच शहरात मोठी बाजारपेठ, दवाखाने, शासकीय कार्यालयात कामकाजासाठी दररोज विविध भागातील हजारो नागरिक दुचाकी, चार चाकी अथवा इतर वाहनांने येतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून ट्रिपल प्रवास. फॅन्सी नंबर, विना परवाना, विना नंबर, कर्कश आवाजाचे सायलन्सर बसविणे तसेच विरुध्द दिशेने गाडी चालविणे यामुळे सतत वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.

Advertisement

याला आळा घालण्यासाठी शहर पोलिसांनी विशेष मोहीम राबवून १०५ वाहनचालकांवर कारवाई केली. ही कारवाई सहायक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे, शहर पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे, वाहतूक शाखेचे ठाणे अंमलदार, होमगार्ड यांनी केली.

Advertisement
Tags :

.