For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

होळीसाठी शहर सजले

12:01 PM Mar 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
होळीसाठी शहर सजले
Advertisement

बेळगाव : होळी उत्सवानिमित्त शहरात उत्साहाचे वातावरण दिसून आले. रविवारी होळी कामाण्णा मंदिरांची स्वच्छता करून रंगरंगोटी करण्यात आली. मंगळवारी होणाऱ्या रंगोत्सवानिमित्ताने रंगांची खरेदी केली जात आहे. त्यामुळे शहरासह उपनगरांमध्ये गल्लोगल्ली रंगांची दुकाने फुलली आहेत. सोमवार दि. 2 रोजी होळीचा सण साजरा होणार आहे. बेळगाव परिसरात गल्लोगल्ली होळी कामाण्णा मंदिरे आहेत. या मंदिरांमध्ये सोमवारी पूजा केली जाणार असून त्यानंतर होळी उभारली जाणार आहे. परंपरेनुसार होलिका दहन केले जाणार आहे.

Advertisement

बेळगावचा सर्वात मोठा होळी उत्सव चव्हाट गल्लीतील चव्हाटा मंदिर परिसरात होत असतो. त्यामुळे या ठिकाणीही मंदिराची रंगरंगोटी करण्यात आली आहे. पारंपरिक पद्धतीने पांगुळ गल्ली येथील अश्वत्थामा मंदिरासमोर लोटांगणाचा कार्यक्रम मंगळवारी होणार आहे. मंगळवार दि. 3 रोजी बेळगावमध्ये रंगोत्सव होणार असल्याने सर्वत्र तयारी केली जात आहे. दरवर्षीप्रमाणे अनेक गल्ल्यांमध्ये रंगोत्सवाची तयारी करण्यात आली आहे. पांगुळ गल्ली, खडेबाजार, गणपत गल्ली, मारुती गल्ली या परिसरात रंगांचे स्टॉल्स मांडण्यात आले आहेत. नैसर्गिक रंगांसोबतच रासायनिक रंगही विक्रीसाठी दाखल झाले आहेत. विविध आकारातील मुखवटे, पिचकाऱ्या, फुगे यासह इतर साहित्य विक्री करण्यात येत आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.