For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सावंतवाडीकरांनी घातला वीज वितरणच्या उपकार्यकारी अभियंत्यांना घेराव !

05:36 PM May 24, 2024 IST | अनुजा कुडतरकर
सावंतवाडीकरांनी घातला वीज वितरणच्या उपकार्यकारी अभियंत्यांना घेराव
Advertisement

8 तास वीज गायब असल्याने शहरवासियांचा उद्रेक

Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

सावंतवाडी शहरात गुरुवारी मध्यरात्री तब्बल आठ तास वीज गायब होती. त्यामुळे सावंतवाडी शहरवासीयांना रात्रभर काळोखात काढावी लागली. त्यामुळे सावंतवाडी शहरवासियांचा उद्रेक झाला. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी वीज वितरणचे उपकार्यकारी अभियंता हिंदुराव चव्हाण यांना घेराव घातला. त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करत सावंतवाडीचे लोकप्रतिनिधी आता मुंबईकर नागरिक झाले आहेत. त्यामुळे त्यांनी सावंतवाडी मतदारसंघातील लोकांना वाऱ्यावर सोडले आहे असा आरोप करीत विजेच्या समस्यांसंदर्भात 30 जूनला काझी शहाबुद्दीन सभागृहात बोलवलेल्या वीज वितरण ठेकेदारांच्या बैठकीत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना बोलवू नये त्यांना तेथे बोलवल्यास केसरकर यांना घेराव घालू असा इशारा देण्यात आला. यावेळी माजी आमदार राजन तेली, माजी नगरसेवक सुरेश भोगटे ,विलास जाधव ,आनंद नेवगी, दिपाली सावंत ,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी , आदी उपस्थित होते. राजन तेली यांनी कार्यकारी अभियंत्यांशी संपर्क साधून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात सावंतवाडी, वेंगुर्ले ,आणि दोडामार्ग तालुक्यात सध्या विजेची मोठी समस्या आहे. वीज गायब असल्याने नागरिकांना त्रास होत असून नुकसान होत आहे . यासंदर्भात उपाययोजना करण्यात वीज वितरण कंपनी अपयशी ठरली आहे . त्यामुळे या संदर्भात 30 जूनला वीज वितरण चे काम घेतलेल्या ठेकेदारांची बैठक बोलवून यासंदर्भात उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली. यासंदर्भात 30 जूनला बैठक होणार आहे. सावंतवाडी शहर असो की ग्रामीण भाग गेले काही दिवस अंधारात आहे. अवकाळी पावसाचे कारण यासाठी दिले जात आहे. मात्र वीज वितरणला नागरिकांकडून आगामी कल्पना देण्यात येते. विज वाहिनीवरील फांद्या तोडण्याचे काम पावसापूर्वी पूर्ण करावे असे दरवर्षी नागरिकांकडून सांगण्यात येते. परंतु ,या संदर्भात उपाययोजना होत नाही. पावसाळा आल्यानंतर वीज वितरण कंपनी जागी होते. त्यामुळे नागरिकांना विज खंडित होत असल्याने त्रास होत आहे. सावंतवाडी शहरात गुरुवारी रात्री तब्बल आठ तास गायब होती त्यामुळे नागरिकांचा उद्रेक झाला. बबन साळगावकर यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी नागरिकांनी वीज वितरणला धडक दिली. वीज वितरणचे उपकार्यकारी अभियंता हिंदुराव चव्हाण यांना जाब विचारला. इन्सुली येथे मेन लाईनवर बिघाड झाल्यामुळे वीज गायब झाली असल्याचे त्यांनी सांगितले.अलीकडे दिवसातून आठ ते दहा वेळा लाईट जाते. यासंदर्भात नागरिकांनी जाब विचारला असता माकड, पक्षी यामुळे लाईट जात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांचा संताप अनावर झाला . वीज वितरण ला फांद्या तसेच झाडे तोडण्यासाठी वारंवार सूचना करण्यात येतात परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जाते . वीज वितरण ते शाखा अभियंता आपले काम योग्य करीत नाहीत असा आरोप करीत नागरिकांनी वीज वितरण कंपनीकडून ग्राहकांना भरमसाठ बिले दिले जातात परंतु ग्राहकांना सुरळीतपणे वीज का दिली जात नाही असा अहवाल करत ग्राहकांचे नुकसान झाल्यास कोण जबाबदार असा अहवाल केला तुम्ही सक्षम नसाल तर नागरिकांना तसे लिहून द्या चार महिने लाईट सुरळीत पणे येणार नाही असेच स्पष्ट करा आणि नागरिकांना रॉकेलचा पुरवठा करा अशी मागणी केली माजी आमदार राजन तेली यांनी केली . वीज वितरणच्या कार्यकारी अभियंत्यांची चर्चा करून 30 जूनला काझीसहाबुद्दीन हॉलमध्ये वीज समस्या सोडवण्यासाठी बैठकीचे आयोजन केले आहे. याला शालेय शिक्षण मंत्र्यांना निमंत्रण देऊ नये असे माजी नगराध्यक्ष साळगावकर यांनी स्पष्ट केले. ते आता सावंतवाडी चे नागरिक राहिलेले नाहीत ते मुंबईकर झालेले आहेत. त्यांनी सावंतवाडी मतदारसंघातील नागरिकांना वाऱ्यावर सोडले आहे असा आरोप करीत वीज वितरण ची आढावा बैठक गेल्या ऑगस्टमध्ये झाली होती ती त्यांनी अद्यापही घेतलेली नाही. यातून त्यांच्या कामाची प्रचिती येते अधिकाऱ्यांनी ही बाब स्पष्ट केलेली आहे असे साळगावकर म्हणाले यावेळी बबन साळगावकर ,,विलास जाधव ,सिताराम गावडे ,अभय पंडित, सुरेश भोगटे ,संजु शिरोडकर ,अशोक दळवी यांनी वीज वितरण च्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

Advertisement

Advertisement
Tags :

.