For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शहर भाजपकडून रास्ता रोको आंदोलन

10:23 AM Jan 10, 2026 IST | Tarun Bharat Portal
शहर भाजपकडून रास्ता रोको आंदोलन
Advertisement

हुबळी येथे भाजप महिला कार्यकर्त्यावर झालेल्या मारहाणीचा निषेध : पोलिसांवर कारवाईची मागणी

Advertisement

बेळगाव : हुबळी येथे भाजप महिला कार्यकर्तीवर पोलिसांनी केलेल्या कथित मारहाणीच्या निषेधार्थ बेळगाव शहर भाजपच्यावतीने राणी चन्नम्मा सर्कलमध्ये रास्ता रोको करून आंदोलन करण्यात आले. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. लवकरात लवकर मारहाण केलेल्या पोलिसांवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यपालांना देण्यात आले. 7 जानेवारी रोजी हुबळी शहरात पोलिसांनी भाजप महिला कार्यकर्त्या सुजाता हंडी यांना विवस्त्र करून मारहाण केल्याची घटना मानवजातीला मान खाली घालायला लावणारी असून हा अक्षम्य गुन्हा आहे. महिलांना पवित्र स्थान देणाऱ्या समाजात राजकीय द्वेषापोटी एका महिलेला सार्वजनिक ठिकाणी अमानुष व अपमानास्पद वागणूक देण्यात आली, ही अत्यंत निंदनीय बाब आहे. राज्य सरकारचे पोलीस विभागावर नियंत्रण नसल्याचे या घटनेतून स्पष्ट होते.

काँग्रेसच्या एका नगरसेवकाने दिलेल्या तक्रारीवरून भाजप कार्यकर्त्या सुजाता हंडी यांच्यावर पोलिसांनी आपली दडपशाही दाखविल्याने राज्यात महिला असुरक्षित असल्याचे हे जिवंत उदाहरण आहे. तसेच बिल्लवा संदेश नावाच्या व्यक्तीने एका जिवंत लोकप्रतिनिधीवर श्र्रद्धांजलीची पोस्ट टाकल्याप्रकरणी तसेच सुळ्याच्या आमदार भागीरथी मुऊळ्या यांची बदनामी करणारी पोस्ट केल्याबद्दल संबंधितावर तात्काळ कारवाई करावी. तसेच हुबळी घटनेची गृहमंत्र्यांनी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, भाजप महानगर जिल्हाध्यक्षा गीता सुतार, माजी आमदार संजय पाटील, मुरगेंद्रगौडा पाटील, अॅड. एम. बी. जिरली, उज्ज्वला बडवाण्णाचे, डॉ. सोनाली सरनोबत, आर. एस. गौडप्पगोळ, प्रसाद देवरमनी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.