सिट्रॉनचे सी 3 मॉडेलचे सादरीकरण
सदरचे मॉडेल 1.2 लिटर पेट्रोल इंजिनसोबत दाखल
नवी दिल्ली : वाहन निर्मितीमध्ये कार्यरत असणारी कंपनी सिट्रॉन इंडिया यांनी बुधवारी आपले नवीन मॉडेल सी 3 यांचे सादरीकरण केले आहे. यामध्ये सदरच्या मॉडेलची सुरुवातीची किमत ही 5.7 लाख रुपये राहणार असल्याची माहिती दिली आहे. कंपनीने सी 3 च्या रुपात भारतामध्ये सब-4 मीटर श्रेणीतील पहिले मॉडेल बाजारात उतरवले आहे. यामध्ये 1.2 लिटर पेट्रोल इंजिनसोबत दाखल केले असल्याचे स्पष्ट केले आहे.
स्टेलॅटिस समूहाची कंपनी सिट्रॉन इंडियाने सी 3 मॉडेलची सुरुवातीची किमत ही 5.7 लाख रुपये इतकी निश्चित केली आहे.
ग्राहकांच्या पसंतीस उतरणार
सिट्रॉन यांनी सी 3 सोबत भारतामध्ये बी हॅचबॅक गटामध्ये पाय ठेवले असून आगामी काळात हे मॉडेल पूर्णपणे ग्राहकांच्या पसंतीस उतरणार असल्याचा विश्वास स्टेलॅटिस इंडियाचे सीईओ रोलँड बूचरा यांनी व्यक्त केला आहे.
या मॉडेलचे सुट्टेपार्ट स्वदेशी
सदर मॉडेलचे जवळपास 90 टक्केपेक्षा अधिकचे सुट्टेपार्ट हे स्थानिक स्तरावर उत्पादीत केलेले आहेत. तसेच या मॉडेलची विक्री देशातील 19 शहरांमध्ये कंपनीच्या शोरुममधून बुधवारपासून सुरु होणार आहे.