CAA अंतर्गत नागरिकत्वाची प्रमाणपत्रे गृहमंत्रालयाकडून अर्जदारांना वितरीत
गृह मंत्रालयाने आज नागरिकत्व (दुरुस्ती) कायद्यांतर्गत १४ जणांना नागरिकत्व प्रमाणपत्रे सुपूर्द केली. "नागरिकत्व (सुधारणा) नियम, 2024 च्या अधिसूचनेनंतर नागरिकत्व प्रमाणपत्रांचा पहिल्या प्रमाणपत्रांचा संच आज जारी करण्यात आला. केंद्रीय गृह सचिव अजय कुमार भल्ला यांनी आज नवी दिल्लीत काही अर्जदारांना नागरिकत्व प्रमाणपत्रे सुपूर्द केली. गृह सचिवांनी अर्जदारांचे अभिनंदन करताना गृहसचिवांनी नागरिकत्व (सुधारणा) नियम, 2024 च्या वैशिष्ट्यांवर प्रकाश टाकला. सत्रादरम्यान सचिव पदावरील अधिकारी, डायरेक्टर (IB), रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते,"
लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात, "भाजपने नागरिकत्व (दुरुस्ती) कायद्यांतर्गत पात्र अर्जदारांना नागरिकत्व देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार केंद्रीय गृहसचिव अजय कुमार भल्ला यांनी राष्ट्रीय राजधानीतील काही अर्जदारांना कागदपत्रे सुपूर्द केली.
या छोटेखानी कार्यक्रमानंतर गृहमंत्रालयाकडून एक निवदेन जारी करताना "नागरिकत्व (सुधारणा) नियम, 2024 च्या अधिसूचनेनंतर नागरिकत्व प्रमाणपत्रांचा पहिला संच आज जारी करण्यात आला. केंद्रीय गृह सचिव श्री अजय कुमार भल्ला यांनी आज नवी दिल्लीत काही अर्जदारांना नागरिकत्व प्रमाणपत्रे सुपूर्द केली. गृह सचिवांनी अर्जदारांचे अभिनंदन केले आणि ठळक वैशिष्ट्यांवर प्रकाश टाकला. नागरिकत्व (सुधारणा) नियम, 2024. या संवादी सत्रादरम्यान सचिव पोस्ट, डायरेक्टर (आयबी), रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया आणि वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते," असे म्हटलं आहे. केंद्र सरकारने लोकसभा निवडणुका सुरू होण्याच्या काही आठवड्यांपूर्वी बरोबर 11 मार्चला नागरिकत्व (दुरुस्ती) कायदा अधिसूचित केला होता.