For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मोकाट कुत्र्यांमुळे मालवणकर हैराण

02:50 PM Sep 04, 2025 IST | अनुजा कुडतरकर
मोकाट कुत्र्यांमुळे मालवणकर हैराण
Advertisement

मालवण । प्रतिनिधी

Advertisement

मालवण शहरात दोन वेळा मोकाट कुत्र्यांची नसबंदी करूनही कुत्र्यांची वाढती संख्या यामुळे शहरात दिवसा आणि रात्रीच्या वेळी फिरणे धोकादायक आणि मुश्किल बनले आहे. शहरातील किनारपट्टी वरील बाजारपेठ परिसरात सुमारे दीडशे ते दोनशे मोकाट कुत्रे आज सकाळी दिसून आल्याने अनेकांच्या मनात धडकी भरली होती.नगरपालिका प्रशासनाकडून दोन वेळा कुत्र्यांची नसबंदी करण्यात आलेली असतानाही वाढत चाललेली कुत्र्यांची संख्या शहरवासीयांसाठी धोकादायक ठरत आहे. काही दिवसांपूर्वी एका छोट्या वासरांचा कुत्र्याने फडशा पाडला होता. तसेच किनारपट्टी भागात मासेमारीसाठी जाणाऱ्या नागरिकांना अनेकदा त्रास दिलेला आहे . वारंवार होत असलेल्या त्रासामुळे शहरवासीय त्रस्त बनले असून नगरपालिका प्रशासनाने यावर ठोस कारवाई करावी अशी मागणी होत आहे. मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी त्यांना पकडून सुरक्षित स्थळी ठेवण्यात यावे अशी एक मागणी होताना दिसत आहे. कुत्र्यांमुळे शहरातील कचराकुंड्यातील कचरा सकाळच्या वेळी रस्त्यावर येऊन पडत असल्याने रस्त्यावरून जाताना नागरिकांना दुर्गंधीमुळे आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यामुळे शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त बनले आहेत.

Advertisement
Advertisement
Tags :

.