For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वीजबिल भरण्यासाठी सलग दुसऱ्या महिन्यातही नागरिकांची गर्दी

11:51 AM Jun 11, 2025 IST | Tarun Bharat Portal
वीजबिल भरण्यासाठी सलग दुसऱ्या महिन्यातही नागरिकांची गर्दी
Advertisement

हेस्कॉमची एटीपी सेवा बंद : बिल ऑनलाईन भरण्याची सूचना

Advertisement

बेळगाव : वीजबिल भरण्यासाठी सलग दुसऱ्या महिन्यातही नागरिकांना रांगा लावाव्या लागत आहेत. वीजबिल भरण्यासाठीचे एटीपी सेंटर बंद असल्यामुळे हेस्कॉमच्या उपकेंद्रांवर ग्राहकांची गर्दी होत आहे. काही ठिकाणी हेस्कॉमने बिलभरणा काऊंटरची संख्या वाढविली असली तरी ग्राहकांना मात्र बराचकाळ थांबावे लागत आहे. हेस्कॉमने काही वर्षांपूर्वी बिल भरून घेण्याचे कंत्राट एका खासगी कंपनीला दिले होते. त्या कंपनीकडून शहराच्या विविध भागात एटीएमप्रमाणे मशीन लावून बिल भरून घेतले जात होते. परंतु या कंपनीचे एप्रिलला कंत्राट संपले असल्याने सेवा ठप्प आहे. त्यामुळे हेस्कॉमच्या बिलभरणा केंद्रांवर बिल भरावे लागत आहे. ज्यांना ऑनलाईन बिल भरणे शक्य नाही ते ग्राहक बिलभरणा केंद्रावर गर्दी करत  आहेत. जून महिन्याचे बिल देण्यात येत असल्याने ते भरण्यासाठी कार्यालयात गर्दी होत आहे. काही दिवसांचीच मुदत दिली जात असून वेळेत बिल न भरल्यास वीजपुरवठा बंद केला जात आहे. त्यामुळे बिल मिळताच भरण्यासाठी ग्राहकांची रिघ लागत आहे. सध्या हेस्कॉमच्या बिलभरणा केंद्रांवर सकाळच्या व दुपारच्या सत्रात ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. त्यामुळे हेस्कॉमने एटीपी सेवा पुन्हा सुरू करावी, अशी मागणी होत आहे.

बिल भरण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध

Advertisement

नागरिकांनी बिल भरण्यासाठी उपकेंद्रांवर गर्दी करू नये, रेल्वेस्टेशनसमोरील हेस्कॉम कार्यालय, नेहरुनगर येथील कार्यालय येथे बिल भरावे. त्याचबरोबर शहरातील बेळगाव वन कार्यालयांमध्ये वीजबिल भरण्याची सुविधा आहे. हेस्कॉमची वेबसाईट, तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारेही ऑनलाईन पद्धतीने बिल भरता येऊ शकते, असे आवाहन हेस्कॉमकडून करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.