For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शासकीय कागदपत्रांसाठी नागरिकांची धडपड

10:08 AM Nov 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
शासकीय कागदपत्रांसाठी नागरिकांची धडपड
Advertisement

गॅरंटी योजनेसाठी जात-उत्पन्न दाखल्याची मागणी

Advertisement

बेळगाव : कचेरी गल्ली उपतहसीलदार नाडा कार्यालयात शासकीय कागदपत्रासाठी नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. शनिवारी विविध शासकीय कागदपत्रांसाठी  रांग लागली होती. विशेषत: जात प्रमाणपत्राचा दाखला, डोमेशियल, मृत्यू प्रमाणपत्र  आदी कागदपत्रांसाठी नागरिकांची धडपड सुरू आहे. गॅरंटी योजनाबरोबर इतर शासकीय सुविधांचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड, रेशनकार्ड बंधनकारक आहे. ही कागदपत्रे मिळविण्यासाठी जात व उत्पन्नाचा दाखला महत्त्वाचा आहे. त्यामुळे जात-उत्पन्न दाखल्याची मागणी वाढू लागली आहे. शैक्षणिक, गॅरंटी योजना आणि इतर शासकीय योजनांच्या लाभासाठी रेशनकार्ड आवश्यक आहे. दरम्यान, रेशनकार्डसाठी ऑनलाईन अर्ज करताना जात-उत्पन्नाचा दाखला विचारला जात आहे. त्यामुळे नागरिकांची जनस्नेही केंद्र आणि उपतहसीलदार कार्यालयात वर्दळ वाढू लागली आहे. डोमेशियल आणि जात-उत्पन्न दाखल्याचा कालावधी पाच वर्षांचा आहे. त्यानंतर पुन्हा शासकीय कागदपत्रासाठी जात-उत्पन्नाचा दाखला काढावा लागतो. त्याबरोबर इतर शैक्षणिक, शेती आणि इतर कामासाठी जात-उत्पन्नाचा दाखला लागतो. त्यामुळे शासकीय कागदपत्रे मिळविण्यासाठी नागरिकांची धडपड सुरू आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.