For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

क्षयरोगावरील बीसीजी लसीकरणाचा नागरिकांनी लाभ घ्यावा

11:25 AM May 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
क्षयरोगावरील बीसीजी लसीकरणाचा नागरिकांनी लाभ घ्यावा
Advertisement

आरोग्य अधिकारी डॉ. महेश किडसन्नावर यांचे आवाहन

Advertisement

खानापूर : शासनाच्या क्षयरोग निर्मूलन प्रक्रियेच्या कार्यक्रमात लसीकरणाला फार महत्त्व आहे. क्षयरोगाच्या नियंत्रणासाठी नवजात बालकानाही लसीकरण करण्यात येते. मात्र प्रौढामध्येही क्षयरोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेता शासनाने क्षयरोगाच्या नियंत्रणासाठी प्रौढानाही लसीकरण देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. याचा लाभ सर्व प्रौढांनी घ्यावा आणि क्षयरोगापासून दूर रहावे, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेश किडसन्नावर यांनी अशोकनगर प्राथमिक आरोग्य केंद्र आणि करंबळ ग्रा. पं. च्यावतीने रुमेवाडी येथे लसीकरणाच्या उद्घाटन कार्यक्रमावेळी बोलताना व्यक्त केले.

डॉ. रमेश पाटील, विलास बेडरे यांच्या हस्ते लसीकरण देवून उद्घाटन करण्यात आले. तालुक्यात पहिल्या फेरीत निवडक 6 विभागात मोफत लसीकरण करण्यात  येणार आहे. यामध्ये मधुमेह-कुपोषणाने ग्रस्त असलेले, क्षयरोगातून बरे झालेले, क्षयरोगाचे रुग्ण, धूम्रपान करणारे व 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना लसीकरण केले जाणार आहे. नागरिकांनी पुढे येऊन लसीकरणास सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. कार्यक्रमात पंचायत सदस्य, कर्मचारी, तालुका आरोग्य विभागाचे कर्मचारी, अशोक नगर प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी आणि रुमेवाडीतील नागरिक उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.