For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कॅन्टोन्मेंटमधील रस्त्यांच्या हस्तांतरणाला नागरिकांचा विरोध

06:22 AM Aug 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
कॅन्टोन्मेंटमधील रस्त्यांच्या हस्तांतरणाला नागरिकांचा विरोध
Advertisement

त. भा. प्रतिनिधी

Advertisement

बेळगाव : कॅन्टोन्मेंटमधील रस्त्यांच्या हस्तांतरणाला नागरिकांमधून आता विरोध होऊ लागला आहे. कॅम्प येथे नागरिकांनी सह्यांची मोहीम उघडली असून लवकरच कॅन्टोन्मेंटला सादर केले जाणार आहे. रस्ते लष्कराच्या ताब्यात गेल्यास नागरिकांना ये-जा करणे अवघड होणार असून कॅन्टोन्मेंटने या प्रस्तावावर फेरविचार करावा, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.

प्रशासकीय दृष्टिकोनातून शहरातील कॅन्टोन्मेंटच्या हद्दीतील तीन रस्ते लष्कराकडे हस्तांतरीत केले जाणार आहेत. तर लष्कराच्या ताब्यातील एक रस्ता कॅन्टोन्मेंटला दिला जाणार आहे. नानावाडीकडे जाणारा रायगट गेट ते जिंझी गेट हा अल्बर्ट इक्का रोड, गणेशपूर रोड येथील हर्षण एन्क्लेव्ह ते रामघाटपर्यंतचा स्मार्ट रोड व कॅम्प येथील शर्कत पार्क ते क्वीन गार्डनपर्यंतचा रस्ता कॅन्टोन्मेंटकडून लष्कराला देण्याचा प्रस्ताव आहे. तर शौर्य चौक ते गांधी चौकापर्यंतचा जिमखाना रस्ता लष्कराकडून कॅन्टोन्मेंटला दिला जाणार आहे.

Advertisement

रस्ता लष्कराच्या ताब्यात गेल्यास तो केव्हाही बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच मागील आठ ते दहा वर्षांपासून हा प्रस्ताव बारगळला होता. रस्ते वाहतुकीस बंद झाल्यास नागरिकांना शहरापर्यंत येताना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे अधिकाधिक आक्षेप नोंदविण्याची तयारी कॅन्टोन्मेंटमधील नागरिकांनी सुरू केली आहे.

आक्षेप नोंदविण्यासाठी नागरिकांनी सह्यांची मोहीम उघडली आहे. कोणत्याही परिस्थितीत रस्ते लष्कराच्या ताब्यात देऊ नयेत, अशी मागणी केली जात आहे. सह्यांची मोहीम पूर्ण होताच या सर्व सह्या व आक्षेप कॅन्टोन्मेंट बोर्डला सादर केले जाणार आहेत.

Advertisement
Tags :

.