For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हिंडलगा नगरपंचायतीच्या हद्दीतील घरे,व्यवसाय करवाढ विरोधात नागरिकांची बैठक

11:07 AM Jun 15, 2026 IST | Tarun Bharat Portal
हिंडलगा नगरपंचायतीच्या हद्दीतील घरे व्यवसाय करवाढ विरोधात नागरिकांची बैठक
Advertisement

ग्रामस्थांतर्फे उद्या निवेदन देण्यात येणार

Advertisement

वार्ताहर/हिंडलगा

येथील नगरपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व घरांचा टॅक्स व व्यवसाय आस्थापनांचा टॅक्स पूर्वीपेक्षा जास्त वाढ झाला असून दुप्पट वाढला आहे. सदर वाढीसंदर्भात यापूर्वी जिल्हा पंचायत व वरिष्ठ अधिकाऱ्यांना गावातील नागरिकांतर्फे निवेदने देण्यात आली होती. तसेच तत्कालीन ग्रामपंचायत यांच्यावतीने देखील निवेदने देऊन टॅक्स कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. तरी सामान्य नागरिकांना हा टॅक्स जास्त प्रमाणात असल्याने कमी करावा, याकरिता रविवार दि. 14 रोजी लक्ष्मी गल्लीतील श्री महालक्ष्मी मंदिरात बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कृषी पत्तीन संस्थेचे चेअरमन रमाकांत पावशे उपस्थित होते. प्रथम गजानन काकतकर यांनी प्रास्ताविक करून बैठकीचा उद्देश जनतेसमोर ठेवला. यावेळी ग्रा.पं. माजी उपाध्यक्षा चेतना अगसगेकर, माजी सदस्य रामचंद्र कुद्रेमनीकर, अशोक कांबळे, यल्लाप्पा काकतकर, शंकर गर्डे, तुकाराम फडके व ग्रामस्थांतून सचिन किल्लेकर, कृष्णा पावशे, जे. व्ही. नाईक यांनी टॅक्स कमी करण्यासंदर्भात चर्चा केली. या चर्चेनंतर मंगळवार दि. 16 रोजी ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्याचे ठरले. याप्रसंगी मंगळवारी निवेदन देताना नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे कळविण्यात आले आहे. मुकुंद कंग्राळकर यांनी आभार मानले.

Advertisement

Advertisement
Tags :

.