For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पहिले रेल्वे गेट तुटल्याने नागरिकांची गैरसोय

06:47 AM Oct 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
पहिले रेल्वे गेट तुटल्याने  नागरिकांची गैरसोय
Advertisement

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisement

रेल्वे क्रॉसिंगदरम्यान दुचाकीची धडक बसल्याने क्रॉसिंगवरील पहिले रेल्वे गेट तुटल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. गेटचे नुकसान झाल्याने रेल्वे क्रॉसिंगवरील वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला होता. वाहनधारक, पादचारी तसेच परिसरातील नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले. गेट तुटल्याने गेटवर मोठी गर्दी झाली झाल्याने वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागला.  परिणामी वाहधारकांना ताटकळत थांबून नंतर पर्यायी मार्गाचा अवलंब केला.

रेल्वे येताना व जाताना क्रॉसिंगवरील गेट बंद करून रस्त्यावरील वाहतूक थांबविली जाते. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रेल्वेगेट सुस्थितीत असणे आवश्यक असते. मात्र दुचाकीच्या धडकेमुळे पहिले गेट तुटल्याने क्रॉसिंगवर समस्या निर्माण झाली होती. तुटलेल्या गेटमुळे वाहनधारकांना क्रॉसिंग ओलांडताना अडचणी आल्या. परिणामी वाहनधारकांना पर्यायी मार्गाने जावे लागून वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने घटनेची तातडीने दखल घेऊन तुटलेले गेट दुऊस्त करावे, अशी मागणी होत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.