For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नागरिकांनो, वाहतूक नियमांचे पालन करा!

11:29 AM Jun 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
नागरिकांनो  वाहतूक नियमांचे पालन करा
Advertisement

पोलीस खाते अॅक्शन मोडमध्ये : एकेरी वाहतूक-फुटपाथबाबत कडक धोरण

Advertisement

बेळगाव : शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी अनेक ठिकाणी एकेरी वाहतूक जारी करण्यात आली आहे. पोलिसांनी संबंधित रस्त्यांवर बॅरिकेड्स उभे करून फलकही लावले असून वाहतूक नियम मोडणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. शहर व उपनगरातील प्रमुख आठ रस्त्यांवरील एकेरी वाहतुकीसंबंधी जागृती करण्यात येत आहे. याबरोबरच फुटपाथवर वाहने उभी करणाऱ्यांवर कारवाईचा सपाटा सुरू करण्यात आला आहे. ज्या ज्या रस्त्यांवर एकेरी वाहतुकीचे नियम लागू करण्यात आले आहेत, त्या रस्त्यांवर फलकही लावण्यात आले आहेत. सुरुवातीला जागृती करण्यासाठी सकाळी व संध्याकाळी वाहतूक पोलीस उभे करण्यात येत आहेत. शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनी नियमांचे काटेकोर पालन करीत वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी पोलीस दलाला सहकार्य करावे, असे आवाहन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले आहे. वर्दीच्या रिक्षा किंवा इतर वाहनातून मुलांना शाळेला पाठवताना खबरदारी घेण्याचे आवाहनही पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहायांनी केले असून वर्दीच्या रिक्षात नियमबाह्या मुले भरू नयेत, अशी सूचना केली आहे. नियम मोडणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्याचा इशाराही पोलीस उपायुक्तांनी दिला आहे.

फुटपाथचा वापर पादचाऱ्यांसाठीच!

Advertisement

फुटपाथवर आपली वाहने उभी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांनी दिला आहे. यासंबंधी त्यांनी एक पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. नागरिकांना ये-जा करण्यासाठी फुटपाथ मोकळे ठेवण्याची गरज आहे. त्यामुळे फुटपाथवर वाहने उभी करणे, व्यापार थाटणे बेकायदा असून पादचाऱ्यांसाठी अडथळा ठरेल, अशी कोणतीच कृती करू नये, असे आवाहनही पोलीस उपायुक्तांनी केले आहे.

एकेरी वाहतुकीचे मार्ग

1) किर्लोस्कर रोड-पश्चिमेकडून पूर्वेकडे जाण्यास मुभा, 2) केळकर बाग- पश्चिमेकडून पूर्वेकडे जाण्यास मुभा, 3) अनसूरकर गल्ली-पूर्वेकडून पश्चिमेस जाण्यास मुभा, 4) रामदेव गल्ली-दक्षिणेकडून उत्तरेस जाण्यासाठी मुभा, 5) गणपत गल्ली-उत्तरेकडून दक्षिणेकडे जाण्यास मुभा, 6) कलमठ रोड- पश्चिमेकडून पूर्वेला जाण्यासाठी मुभा, 7) नेहरूनगर दुसरा क्रॉस-तट्टे इडली क्रॉसजवळून आझमनगरकडे पूर्वेकडून पश्चिमेला जाण्यासाठी मुभा, 8) नेहरूनगर तिसरा क्रॉस- पश्चिमेकडून पूर्वेस जाण्यास मुभा (मुजावर आर्केडशेजारी).

Advertisement
Tags :

.