For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सिंधुदुर्गात पेट्रोलच्या तुटवड्यामुळे नागरिक हैराण

04:46 PM May 06, 2026 IST | अनुजा कुडतरकर
सिंधुदुर्गात पेट्रोलच्या तुटवड्यामुळे नागरिक हैराण
Advertisement

बहुतांशी ठिकाणी ''पेट्रोल पंप बंद'' चे फलक

Advertisement

सावंतवाडी : प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांशी भागात पेट्रोल पंपांवर पेट्रोलचा तुटवडा भासत आहे . गेले काही दिवस मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात पर्यटकांची संख्या वाढल्याने पेट्रोल भरण्यासाठी सर्वच भागात गर्दी होत होती. त्याचा परिणाम पेट्रोलच्या उपलब्धतेवर झाला असून आज सावंतवाडी शहरातील सर्व पेट्रोल पंपांवर पेट्रोलचा तुटवडा असल्याचे कारण देत ''पेट्रोल पंप बंद'' असा फलकही लावण्यात आला होता. एकीकडे प्रशासन वारंवार दावा करत आहे सिंधुदुर्गात पेट्रोल व गॅस साठा मुबलक आहे पण ,दुसरीकडे मात्र जिल्ह्यातील बहुतांशी शहरातील पेट्रोल पंपावर काल संध्याकाळपासून पेट्रोलच उपलब्ध नसल्याने अनेक वाहनधारकांचे मोठे हाल झाले आहेत . सावंतवाडी शहरातील दोन्ही पेट्रोल पंप आज सकाळपासूनच बंद होते. त्यामुळे वाहनधारकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आज सायंकाळनंतर पेट्रोल उपलब्ध होईल असे सांगण्यात आले खरे परंतु पेट्रोल उपलब्ध होईल का याबाबत वाहनधारकात शंका निर्माण झाली आहे. पेट्रोल ,डिझेल पंप बंदमुळे सध्याच्या लग्न हंगामात अनेकांचे हाल झाले असून व्यावसायिक वाहनधारकांनाही पेट्रोल पंप बंदचा परिणाम भोगावा लागत आहे .

Advertisement

Advertisement
Tags :

.