महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सरमळेत धनगर बांधवांच्या शितपवाडीत तीन दिवसांपासुन वीज गायब

05:28 PM Nov 09, 2023 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

रात्र जाते अक्षरशः काळोखात ; विज वितरणच्या कारभाराबाबत नागरिक संतप्त

Advertisement

ओटवणे |  प्रतिनिधी

Advertisement

सरमळे गावात अतिदुर्गमस्थानी असलेल्या शितपवाडीत गेल्या तीन दिवसांपासून वीज गायब असुन या वाडीतील धनगर बांधवांना रात्र अक्षरशः काळोखात काढाव्या लागत आहेत. याबाबत बांदा तसेच माडखोल येथील विज अधिकाऱ्यांचे लक्ष वेधूनही विज पुरवठा सुरळीत करण्याबाबत टोलवाटोलवी सुरू असल्याने विज वितरण कंपनीच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

सरमळे गावातील दुर्लक्षित शितपवाडी डोंगरमाथ्यावर उंच टेकडीवर आहे. डोंगरमाथ्यावरील धनगर समाजाच्या या वाडीत मुळातच समस्यांचा डोंगर आहे. या वाडीला माडखोल विज विभागामार्फत केसरी गावातून वीजपुरवठा होतो. तर ही वाडी सरमळे गावात येत असुन वीज वितरण कंपनीच्या बांदा विभागातून या वाडीला सेवा दिली जाते. घनदाट जंगलाने वेढलेल्या शितपवाडीत अनेकदा वीजपुरवठा खंडित होतो. अशा वेळी या धनगर बांधवांनी माडखोल विभागाकडे तक्रार केली असता सरमळे गावातील ही वाडी बांदा वीज विभागात असल्याचे सांगून जबाबदारी टाळली जाते तर बांदा विभागाकडे गेले असता या वाडीला माडखोल विभागातून वीज पुरवठा होत असल्याने हे त्या विभागाचे काम असल्याचे सांगून मोकळे होतात.

अशा वेळी या वाडीला विज पुरवठा सुरळीत करण्यासाठी कोणी वालीच नसल्याने याचा फटका शितपवाडीला बसतो. या धनगर बांधवांना गेले तीन रात्री अंधारात काढाव्या लागत आहे. त्यामुळे संबधित खात्याच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी याची तात्काळ दखल घेऊन या वाढीच्या वीज पुरवठयाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी शितपवाडी वासियांची मागणी आहे.

दरम्यान याबाबत सरमळे माजी उपसरपंच समीर माधव यांनीही संबंधित अधिकारी वर्गासह कर्मचाऱ्यांचे लक्ष वेधले असता वीज पुरवठा शुक्रवारी सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. मात्र त्यादृष्टीने अद्याप कोणतीही कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे गुरुवारची रात्रही शितपवाडीवासीयांना काळोखातच काढावी लागणार आहे. याबाबत समीर माधव यांनी सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष संजय लाड यांचेही लक्ष वेधले असून याबाबत कार्यवाही न झाल्यास सावंतवाडी येथील वीज वितरणच्या कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा शितपवाडीवासीयांच्यावतीने समीर माधव यांनी दिला आहे.

 

Advertisement
Tags :
# tarun bharat news# sarmale # light #
Next Article