महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

ऐनापूरच्या रहिवाशाला 42 लाखांचा गंडा

12:22 PM Jul 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भरघोस नफ्याचे आमिष दाखवून सायबर गुन्हेगारांचे कारनामे सुरूच : धनिकही पडताहेत फशी

Advertisement

बेळगाव : शेअरमार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास उत्तम नफा मिळवून देऊ, असे सांगत फसवणुकीचे प्रकार सुरूच आहेत. बेळगाव शहर व जिल्हा सीईएन पोलीस स्थानकात यासंबंधी तक्रार देण्यासाठी येणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. ऐनापूर, ता. कागवाड येथील नागरिकाला 42 लाख रुपयांना गंडवण्यात आले आहे. ट्रेडिंगच्या माध्यमातून फसवणुकीच्या प्रकारात खासकरून उच्चशिक्षित फशी पडू लागले आहेत. डॉक्टर, अभियंते, सरकारी अधिकारी सायबर गुन्हेगारांच्या गळाला लागू लागले आहेत. ऐनापूर येथील विजयेंद्र बिळ्ळूर यांना 42 लाख 15 हजार रुपयांना फसवण्यात आल्याचे उघडकीस आले असून बुधवारी त्यांनी जिल्हा सीईएन पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे.

Advertisement

सीईएन पोलिसांकडून तपास सुरू

सीईएनचे पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर व त्यांचे सहकारी या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत. 31 मे ते 26 जून 2024 यावेळेत टप्प्याटप्प्याने 21 लाख 35 हजार रुपये ट्रेडिंगमध्ये गुंतवण्यात आले. 6 जून रोजी त्यांनी खात्री पटवून घेण्यासाठी आपल्या खात्यातील 10 हजार रुपये काढले. ही रक्कम मिळाल्यामुळे त्यांना खात्री पटली. पुढे गुंतवणूक सुरूच ठेवली. त्यानंतर 12 ते 24 जूनपर्यंत टप्प्याटप्प्याने पुन्हा 21 लाख रुपये त्यांनी गुंतवणूक केली. परत एकदा खात्री करून घेण्यासाठी आपल्या खात्यातील पैसे काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना पैसे मिळाले नाहीत. सोशल मीडियावर चॅटिंग करून शेअरमार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास भरपूर परतावा देण्याचे आमिष दाखवून सायबर गुन्हेगारांनी त्यांना 42 लाख रुपयांना ठकवले आहे. अथणी, कागवाड,गोकाकसह वेगवेगळ्या तालुक्यातील धनिकांनी झटपट नफा मिळविण्याच्या नादात मोठ्या प्रमाणात रक्कम गमावली असून ही सर्व प्रकरणे तपासाच्या टप्प्यावर आहेत. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर क्राईम विभागाचे पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर व त्यांच्या सहकाऱ्यांनी या प्रकरणी तपास हाती घेतला आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article