For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सिटीज-2 चे प्रकल्प पीपीपी मॉडेलच्या धर्तीवर चालविण्यास देणार

02:56 PM Feb 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
सिटीज 2 चे प्रकल्प पीपीपी मॉडेलच्या धर्तीवर चालविण्यास देणार
Advertisement

महापालिकेत स्मार्ट सिटीतर्फे कार्यशाळेचे आयोजन

Advertisement

बेळगाव : सिटीज-2 योजनेमध्ये बेळगाव शहराची निवड झाली नसल्याने विविध प्रकल्पांसाठी 135 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या मुख्य सभागृहात गुरुवारी राबविल्या जाणाऱ्या प्रकल्पांची माहिती देण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे सदर प्रकल्प महापालिकेकडून चालविण्याऐवजी या योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक असलेल्या कंपन्यांना जागा देऊन पीपीपी मॉडेलवर त्यांना चालविण्यास देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

बेळगाव शहराची स्मार्ट सिटी 1 मध्ये निवड झाल्यानंतर सदर योजनेंतर्गत शहरात अनेक विकासकामे राबविण्यात आली. यानंतर पुन्हा शहराची सिटीज-2 मध्ये निवड झाली असून यासाठी 135 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. या अंतर्गत घणकचरा व्यवस्थापनासह अनेक अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविले जाणार आहेत. याबाबत स्मार्ट सिटीकडून महापालिकेला यापूर्वी माहिती देण्यात आली होती. मात्र याबाबत सविस्तर माहिती देण्याची विनंती करण्यात आल्याने गुरुवारी स्मार्ट सिटीकडून महापालिकेतील मुख्य सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

Advertisement

त्यावेळी पीपीपी मॉडेलच्या धर्तीवर सदर प्रकल्प खासगी कंपन्यांना चालविण्यासाठी देण्याबाबत निर्णय घेण्यात आला. प्रकल्प उभे करण्यासाठी महापालिका संबंधित कंपन्यांना जागा देणार. कारण सरकारच्यावतीने सदर प्रकल्प सुरू केल्यास ते कायमस्वरुपी चालणार नाहीत. यापूर्वी मनपा अधिकारी व नगरसेवक विविध शहरांच्या अभ्यासदौऱ्यावर गेले होते. त्यावेळ सदर प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे ज्या खासगी कंपन्या हे प्रकल्प चालवत आहेत. ते प्रकल्प बंद झालेले नाहीत, असे दिसून आले आहे. सिटीज-2 मधून राबविण्यात येणारा कोणताही प्रकल्प असो त्याचा पूर्णपणे अभ्यास केल्याशिवाय सुरु करण्यात येऊ नये. सरकारी निधी मिळतो म्हणून याचा कसाही वापर करून चालणार नाही. त्यामुळे सिटीज -2 मधील प्रकल्प पीपीपी मॉडेलच्या धर्तीवर खासगी कंपन्यांना चालविण्यास देण्यात येतील. यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

सिटीज -2 मधून शहरासाठी 135 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यासाठी भरावा लागणारा आवश्यक निधी महापालिका भरण्यास तयार आहे. त्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. तसेच याबाबतचे लेखी पत्रही देण्यात आले आहे. मात्र स्मार्ट सिटीकडून काहीजणांना अर्धवट माहिती देण्यात आली आहे. अर्धवट माहिती देणारे कोण? अशी विचारणा करत अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. यावेळी महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी, मनपा आयुक्त कार्तिक एम. स्मार्ट सिटीच्या व्यवस्थापकीय संचालिका, अधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.