For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘सिटाडेल २’चा ट्रेलर सादर

06:56 AM May 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘सिटाडेल २’चा ट्रेलर सादर
Advertisement

प्रियांका चोप्रा मुख्य भूमिकेत

Advertisement

प्रियांका चोप्रा, रिचर्ड मॅडेन आणि स्टेनली टुची पुन्हा एकदा ओटीटीवर अॅक्शन अवतारात परतले आहेत. अमेझॉन प्राइम व्हिडिओने स्वत:ची लोकप्रिय अमेरिकन स्पाय सीरिज सिटाडेलच्या दुसऱ्या सीझनचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. याचबरोबर निर्मात्यांनी याच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.

2 मिनिटे 42 सेकंदांच्या या ट्रेलरमध्ये यावेळी नवी टीम, नवे मिशन आणि जोरदार अॅक्शन सीक्वेंस आहेत. प्रियांका एकीकडे नादिया सिंहच्या भूमिकेत परतणार आहे, तर ट्रेलरमध्ये तिचा ग्लॅमरल अवतार पाहण्याजोगा आहे. ट्रेलरमध्ये प्रियांका, रिचर्ड हे टॉप एजंट्स म्हणून नव्या मिशनवर निघतात, तर स्टेनलीची भूमिका बर्नार्ड ऑरलिकला या नव्या धोकादायक मिशनसाठी स्वत:च्या जुन्या टीमचे सदस्य हवे आहेत. आता तिघेही मिळून नवी टीम तयार करतात आणि मानवतेला वाचविण्यासाठी मिशनवर रवाना होता.  सिटाडेल सीझन 2 ही सीरिज 6 मे पासून स्ट्रीम होणार आहे. ही सीरिज अमेझॉन प्राइम व्हिडिओवर पाहता येणार आहे. यात एकूण 7 एपिसोड्स असतील. तर या सीरिजमध्ये प्रियांका, रिचर्ड आणि स्टेनली यांच्यासोबत लेस्ली मॅनविल, एशले कमिंग्स, जॅक रेयनोर, मॅट बेरी, लीना अल अरबी, मर्ले डँड्रिज, गॅब्रियल लियोन आणि रायना वॅलैंडिंगहम हे कलाकार असतील.

Advertisement

Advertisement
Tags :

.