सर्किट बेंच प्रश्नी कोल्हापूरात उद्या बैठक! खंडपीठ कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसह सहा जिह्यातील लोकप्रतिनिधी राहणार हजर
बैठकीत सर्किट बेंचप्रश्नी आंदोलनाची ठरणार पुढील दिशा
कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूरमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच स्थापन व्हावे, याकरीता रविवार (दि.22) सकाळी अकरा वाजता सहा जिह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची बैठक बोलविण्यात आली आहे, अशी माहिती खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक व कोल्हापूर जिल्ह बार असोसिएनचे अध्यक्ष अॅङ सर्जेराव खोत यांनी दिली आहे. तसेच या बैठकीत मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंचप्रश्नी आंदोलनाची पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार असल्याची माहिती सुत्रानी दिली. त्यामुळे या बैठकीकडे सहा जिह्यातील वकिल वर्गाबरोबर नागरिकांचे लक्ष्य लागले आहे.
कोल्हापूरात मुंबई उच्च न्यायालयाचे सकि;ट बेंच स्थापन व्हावे. याकरीता 7 सप्टेंबर 2015 साली मुंबई उच्च न्यायालयाचे तत्कालीन सरन्यायाधीश मोहित शहा यांनी स्वत:चे मत स्पष्ट कऊन, त्याबाबतचा अहवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या अभिलेखावर दिला आहे. त्यामुळे गेल्या अडीच वर्षापूर्वी कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदूर्ग या सहा जिह्यातील सर्व पक्षीय लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमुर्तीच्याकडे विनंती केली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आणि कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे सदस्य अॅङ तानाजी नलवडे यांच्या अध्यक्षतेखाली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती समवेत बैठक सुध्दा झाली. या बैठकीत मुख्य न्यायामुर्तीनी राज्याचे मुख्यमंत्री एकनात शिंदे यांची भेट झाल्यानंतर सर्किट बेंच स्थापनेचा निर्णय घेऊ, असे सांगितले होते. तसे खंडपीठ कृती समितीला पत्राव्दारे कळविलेले आहे.
कोल्हापूरमध्ये 10 ऑगस्ट रोजी सहा जिह्यातील सर्व वकिलांची वकिल परिषद झाली होती. या वकिल परिषदेमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांना भेटीचे पत्र पाठविल्याचे सांगितले होते. मात्र अद्यापी तसे पत्र मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायामूर्तीच्या कार्यालयाकडे पोहोचविण्यात आलेले नाही. त्यामुळे कोल्हापूर येथे सहा जिह्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच स्थापन करावे. या प्रश्नी पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी सहा जिह्यातील सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी यांची बैठक बोलविण्यात आली आहे. सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी बरोबर सहा जिह्यातील बार असोसिएशनचे पदाधिकारी व कोल्हापूर खंडपीठ कृती समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थितीत राहणार आहेत.