For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सिप्लाच्या नफ्यात 57 टक्के घसरण

06:00 AM Jan 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
सिप्लाच्या नफ्यात  57 टक्के घसरण
Advertisement

नवी दिल्ली :

Advertisement

औषध क्षेत्रातील दिग्गज कंपनी सिप्लाने आर्थिक वर्ष 2025-26 च्या तिसऱ्या तिमाहीतील नफ्याची आकडेवारी जाहीर केली असून नफ्यात घसरण दिसून आली आहे. कंपनीने सदरच्या तिमाहीत 676 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा प्राप्त केला आहे. कंपनीचा नफा 57 टक्के इतका कमी झाला आहे.

अमेरिकेत यांच्या औषधांची विक्री कमी झाली आहे. त्यामुळेच कंपनीच्या नफ्यावर नकारात्मक परिणाम दिसला आहे. मुंबईत मुख्यालय असणाऱ्या या कंपनीने मागच्या वर्षी ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत 1571 कोटी रुपयांचा नफा प्राप्त केला होता. तिसऱ्या तिमाहीत कंपनीने 7074 कोटी रुपयांचे एकूण उत्पन्न प्राप्त केले आहे. यामागच्या वर्षी समान अवधीत 7073 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले होते.

Advertisement

अमेरिकेत विक्री 22 टक्के घसरली

कंपनीच्या औषधांची उत्तर अमेरिकेतील विक्री तिमाहीदरम्यान 22 टक्के इतकी घसरलेली दिसून आली. 1485 कोटी रुपयांची औषध विक्री करण्यात आली होती.

Advertisement
Tags :

.