For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सिंड्रेला, रुपम, टेटे विजेते

06:16 AM Jan 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
सिंड्रेला  रुपम  टेटे विजेते
Advertisement

वृत्तसंस्था/ बदोडा

Advertisement

विश्व टेबल टेनिस फेडरेशनच्या 2026 च्या युथ कंटेंडर 13 आणि 17 वर्षाखालील मुला-मुलींच्या टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेत सिंड्रेला दास आणि रुपम सरदार यांनी अनुक्रमे मुलींच्या आणि मुलांच्या एकेरीचे जेतेपद पटकाविले. तर दिवीजा पॉल आणि देव प्रणव भट यांनी अनुक्रमे 13 वर्षाखालील मुलींच्या आणि मुलांच्या एकेरीचे अजिंक्यपद मिळविले.

गेल्या वर्षी 19 वर्षाखालील मुलींच्या वयोगटातील एकेरीचे जेतेपद मिळविणाऱ्या सिंड्रेला दासने 17 वर्षाखालील वयोगटातील एकेरीचे जेतेपद मिळविताना अंतिम सामन्यात हंसीनी माथनचा 11-3, 9-11, 11-9, 11-8 असा पराभव केला. तर 17 वर्षाखालील मुलांच्या एकेरीतील अंतिम सामन्यात रुपम सरदारने सोहम मुखर्जीचा 11-8, 6-11, 11-5, 11-3 असा पराभव केला. या स्पर्धेमध्ये विविध राज्यातील 226 टेबलटेनिसपटू सहभागी झाले होते. सदर स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे.

Advertisement

या स्पर्धेतील मुलींच्या 13 वर्षाखालील वयोगटातील एकेरीच्या अंतिम सामन्यात दिविजा पॉलने हर्षिता नुरानीचा 11-7, 7-11, 8-11, 11-7, 11-5 असा पराभव करत विजेतेपद पटकाविले तर मुलांच्या 13 वर्षाखालील वयोगटातील अंतिम सामन्यात देव प्रणव भटने अश्वजीत मुथूकुमारनचा 11-6, 7-11, 11-6, 11-4 असा पराभव करत अजिंक्यपद मिळविले.

Advertisement
Tags :

.