For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सिगन, एक्स्ट्रीम स्पोर्ट्स विजयी

10:33 AM Jan 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
सिगन  एक्स्ट्रीम स्पोर्ट्स विजयी
Advertisement

नरेंद्र कुलकर्णी चषक टी-20 क्रिकेट स्पर्धा : विरेश गौडर, राहुल वेर्णेकर सामनावीर

Advertisement

बेळगाव : सिग्नीचर  स्पोर्ट्स क्लब आयोजित नरेंद्र कुलकर्णी चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून सिगन क्रिकेट क्लबने युनायटेड क्रिकेट क्लबचा 9 गड्यांनी तर एक्स्ट्रीम सीसीने समर्थ सीसीचा 3 गड्यांनी पराभव करुन प्रत्येकी 2 गुण मिळविला. विरेश गौडर व राहुल वेर्णेकर यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आले. एसकेई प्लॅटिनम ज्युब्ली मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात समर्थ सीसीने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 गडी बाद 136 धावा केल्या. त्यात केतश कोल्हापुरेने 3 षटकार 3 चौकारांसह 60, अरिहंत अम्मनगीने 2 चौकारांसह 17 धावा केल्या. एक्स्ट्रीमतर्फे राजू हमन्नावरने 3 तर राहुल वेर्णेकर व सागर अंगडी यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.

प्रत्युत्तरादाखल खेळताना एक्स्ट्रीम संघाने 17.5 षटकात 7 गडी बाद 137 धावा करुन सामना 3 गड्यांनी जिंकला. त्यात राहुल वेर्णेकरने 1 षटकार, 4 चौकारांसह 36, मनोज सुतारने 1 षटकार, 4 चौकारांसह 31 तर विशाल गौरगोंडाने 2 षटकार 2 चौकारांसह 28 धावा केल्या. दुसऱ्या सामन्यात युनायटेड सीसीने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 गडी बाद 123 धावा केल्या. त्यात इम्रान पिरजादेने 1 षटकार, 6 चौकारांसह 32, जहांगीर मुल्लाने 2 चौकारांसह 30 धावा केल्या. सिगनतर्फे सचिन कुलकर्णी, राजकेतन सावंत व सुजल गोरल व विजय कुरी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना सिगन संघाने 12.4 षटकात 1 गडी बाद 127 धावा करुन सामना 9 गड्यांनी जिंकला. त्यात विरेश गौडरने 4 षटकार, 5 चौकारांसह 68, माजीद मकानदारने 2 षटकार 3 चौकारांसह 31, शुभम भिशनकोप्पने 3 चौकारांसह 22 धावा केल्या. युनायटेडतर्फे वासीन होनगेकरने 1 गडी बाद केला.

Advertisement

Advertisement
Tags :

.