For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सनी लिओनीला दिलेल्या मानधनाचा सीआयडीने मागविला तपशील

02:45 PM Jun 12, 2026 IST | Tarun Bharat Portal
सनी लिओनीला दिलेल्या मानधनाचा सीआयडीने मागविला तपशील
Advertisement

बेंगळूर : राज्यात तीव्र खळबळ माजवलेल्या ‘शिवम असोसिएट्स’च्या कोट्यावधी रुपयांच्या आर्थिक व्यवहार प्रकरणी कर्नाटक गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) तपासाला गती दिली आहे. या प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. शिवम असोसिएट्सचे मालक शिवानंद निलण्णावर यांनी निर्मिती केलेल्या चित्रपटात काम करण्यासाठी सनी लिओनीला मिळालेल्या मानधनाचा तपशील मागवण्यासाठी सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी नोटीस बजावली आहे. ही नोटीस केवळ तपासाचा भाग असून यातून अभिनेत्रीने कोणताही गैरप्रकार किंवा गुन्हा केल्याचे सूचित होत नाही,असं तपास अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Advertisement

शिवम असोसिएट्सचे मालक शिवानंद निलण्णावर यांच्यावर गुंतवणूकदारांना जास्त व्याजदराचे आमिष दाखवून अनधिकृत ठेवी आणि गुंतवणूक योजनांच्या माध्यमातून फसवणूक केल्याचा आरोप आहे. सीआयडी पोलीस सध्या या संस्थेशी संबंधित पैशांच्या हस्तांतरणाचा आणि व्यवहारांची माहिती गोळा करत आहेत. शिवानंद निलण्णावर निर्मित 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘चॅम्पियन’ या कन्नड चित्रपटातील ‘डिंगर बिल्ली नानू’ या गाण्यात अभिनेत्री सनी लिओनीने अभिनय केला आहे. या मोबदल्यात तिला 1 कोटी रु. मानधन देण्यात आल्याचे सीआयडीच्या तपासातून समोर आल्याचे सांगितले जात आहे. गुंतवणूकदारांकडून जमा केलेला पैसा या चित्रपटासाठी आणि अभिनेत्रीला मानधन देण्यासाठी वापरण्यात आला आहे का, याचा तपास केला जात आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.