For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीआयडी चौकशी

06:33 AM Jan 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीआयडी चौकशी
Advertisement

प्रतिनिधी/ पुणे

Advertisement

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्युप्रकरणी राज्यसरकारने विमान अपघाताची सीआयडीमार्फत चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे अपघातस्थळी कोणालाही जाऊ न देण्याच्या स्पष्ट सूचनादेखील देण्यात आल्या आहे.

याप्रकरणात बारामती पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू, अशी नोंद करण्यात आलेली आहे. परंतु, यापुढील तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. 28 जानेवारी रोजी मुंबई विमानतळावऊन लेअरजेट या आठ आसनी विमानाने अजित पवार हे बारामतीमध्ये जिल्हा परिषद प्रचाराच्या सभांसाठी जात असताना त्यांचा लँडिंगपूर्वीच विमान कोसळून अपघाती मृत्यू झाला. यामध्ये त्यांच्यासह एकूण पाचजणांचा दुर्देवी मृत्यू झाला. कमी दृश्यमानता आणि पायलटचा रन-वे वर उतरताना चुकलेला अंदाज यामुळे अपघात झाल्याची चर्चा आहे. त्याचप्रमाणे सदर अपघात विमानातील तांत्रिक बिघाडामुळे किंवा घातपातमुळे झाला का? अशी देखील चर्चा सुऊ झाली आहे. त्यामुळे याप्रकरणाचा तपास योग्यप्रकारे केला जावा आणि विविध गोष्टीची पडताळणी करण्यासाठी सीआयडीमार्फत तपास केला जाणार आहे. सीआयडीने अॅक्सीडेंटल डेथ रिपोर्ट (एडीआर) ताब्यात घेतला असून प्रत्यक्ष घटनास्थळीदेखील तपासणी कऊन तज्ञांची मदत घेतली जाणार आहे. तर, नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या अखत्यारित विमान अपघाताचा तपास एएआयबी देखील करत आहे.

Advertisement

तपासाची कागदपत्रे वर्ग

कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी म्हणाले, की उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास राज्य सरकारच्या आदेशानुसार सीआयडीकडे वर्ग करण्यात आलेला आहे. सीआयडीचे पोलीस महानिरीक्षक सुधीर हिरेमठ हे तपास प्रमुख म्हणून काम पाहत आहेत. पुणे ग्रामीण पोलिसांकडून या केसच्या तपासाबाबतची सर्व कागदपत्रे सीआयडीला वर्ग करण्यात आली आहे.

Advertisement
Tags :

.