येशू ख्रिस्ताच्या जन्मोत्सवाने नाताळपर्वास प्रारंभ
राज्यात सर्वत्र जल्लोष, नववर्षापर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन
प्रतिनिधी/ पणजी
राज्यात नाताळपर्व प्रारंभ झाले असून बुधवारी रात्री 12 वा. प्रमुख चर्चमध्ये येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव व प्रार्थना कऊन नाताळची सुऊवात झाली. त्याचबरोबर घंटानाद कऊन बाळ येशूचे स्वागत करण्यात आले. हे नाताळपर्व आता दि. 1 जानेवारी नववर्ष उजाडेपर्यंत चालू राहणार आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्यात गेल्या कित्येक दिवसांपासून सर्वत्र नाताळ आणि नववर्ष स्वागताच्या तयारीची लगबग सुऊ होती. आता ती तयारी पूर्णत्वाकडे पोहोचली असून विद्युत रोषणाई माळा, ख्रिसमस ट्री, सांताचे मुखवटे, टोप्या, रंगीबेरंगी नक्षत्रे यांची ख्रिस्ती बांधवांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली. त्यांच्या सज्जतेने तसेच सर्वत्र येशूच्या जन्मावर देखावे यांनी त्यांची घरे उजळून गेली आहेत. राज्यात विविध शहरी व ग्रामीण भागात नाताळ सण उत्सवाची धूम बघायला मिळत आहे.