क्रिस इवांस अन् एल्बाला कन्यारत्न
06:29 AM Nov 04, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्सचा ‘कॅप्टन अमेरिका’ म्हणजेच हॉलिवूड अभिनेता क्रिस इवांस पिता झाला आहे. इवांस आणि त्याची पत्नी एल्बा बॅप्टिस्टा यांच्या घरी कन्येचे आगमन झाले आहे. या दांपत्याने मॅसाच्युसेट्समध्ये स्वत:ची मुलगी अल्मा ग्रेस बॅप्टिस्टा इवांसचे स्वागत पेले आहे. दोघांनी 2023 मध्ये विवाह केला होता. क्रिस आणि एल्बा दोघेही स्वत:च्या खासगी आयुष्याला प्रकाशझोतापासून दूर ठेवतात. क्रिस दीर्घकाळापासून परिवार सुरू करण्याची इच्छा व्यक्त करत होता. एका मुलाखतीत त्याने पत्नी, मुले आणि परिवार निर्माण करणे हीच माझी इच्छा असल्याचे त्याने म्हटले होते. क्रिस 43 वर्षीय आहे, तर एल्बा केवळ 28 वर्षांची आहे. क्रिस हा हॉलिवूडमधील अत्यंत नावाजलेला अभिनेता आहे. त्याच्या नावावर सुपरहिट चित्रपट आहेत. एल्बा ही प्रसिद्ध पोर्तुगाली अभिनेत्री आहे.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article