For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सांगली फाट्यावर चौरंगी अपघात! महागड्या गाड्यांचे लाखो रुपयांचे नुकसान

04:42 PM Jun 26, 2024 IST | Abhijeet Khandekar
सांगली फाट्यावर चौरंगी अपघात  महागड्या गाड्यांचे लाखो रुपयांचे नुकसान
Sangli Phata Accident
Advertisement

पुलाची शिरोली / प्रतिनिधी

पुलाची शिरोलीत सांगली फाटा येथील चौरंगी अपघातात कार गाड्यांचे लाखो रुपयांचे नुकसान. किरकोळ जखमी वगळता जिवीत हानी नाही.हा अपघात पूणे बंगलूर राष्ट्रीय महामार्गावर सांगली फाटा येथे बुधवारी दुपारी साडेबारा च्या सुमारास घडला.

Advertisement

पुणेहून कोल्हापूरच्या दिशेने फॉर्च्यूनर व इंडिका कार जात होती . त्यांच्या पाठोपाठ डंपर कोल्हापूरच्या दिशेने जात होता.दरम्यान महामार्गाचे काम सुरू असल्याने डंपर चालकाने अचानक ब्रेक लावला,तसेच फॉर्च्युनर व इंडिका कारचालकांनेही सावधानता बाळगत ब्रेक लावला. पण पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने या दोन्ही गाड्यांना जोराची धडक दिली. या धडकेमुळे दोन्ही कार पुढे अचानक थांबलेल्या डंपरवर फॉर्च्युनर व इंडिका कार घडकल्या. यामुळे मोठ्या प्रमाणात इंडीका कारचे नुकसान झाले तर फॉर्च्युनर कारचे कमी नुकसान झाले. या अपघातात सुदैवाने किरकोळ जखमी वगळता कोणतीही जीवित हानी झाली नाही .या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक एक तासापेक्षा अधिक वेळ ठप्प झाली होती.

Advertisement
Advertisement
Tags :

.