For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चौके ग्रामपंचायत इमारतीसाठी 25 लाखांचा निधी देणार

03:34 PM Feb 25, 2026 IST | अनुजा कुडतरकर
चौके ग्रामपंचायत इमारतीसाठी 25 लाखांचा निधी देणार
Advertisement

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची ग्वाही ; चौके ग्रामपंचायत कार्यालयात नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार

Advertisement

चौके/ प्रतिनिधी

चौके गावाचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून निश्चित प्रयत्न करणार तसेच ग्रामपंचायत इमारतीसाठी 25 लाखांचा निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. दत्ता सामंत यांनी चौके ग्रामपंचायत कार्यालयात नवनिर्वाचित सदस्यांच्या सत्कार प्रसंगी बोलताना दिली.चौके ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य सौ .अक्षता राजन गावडे आणि पंचायत समिती सदस्या मानसी भोगावकर यांचा भव्य सत्कार शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत आणि मालवण गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्री दत्ता सामंत बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच पी.के. चौकेकर होते. तर व्यासपीठावर गटविकास अधिकारी श्याम चव्हाण ,सत्कारमूर्ती अक्षता गावडे, सौ. मानसी भोगावकर,माजी सरपंच राजा गावडे, सुरेश चौकेकर ,सामाजिक कार्यकर्ते बिजेंद्र गावडे ,ज्येष्ठ सेवानिवृत्त शिक्षक सदाशिव गावडे गुरुजी , उद्योजक नाना आंबेरकर आदी उपस्थित होते .कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज आणि संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. आपल्या भाषणात श्री दत्ता सामंत म्हणाले की ग्रामपंचायत, पंचायत समिती,जिल्हा परिषदेवर राज्यात आणि केंद्रात महायुतीची सत्ता आहे. त्यामुळे विकासकामे करताना कोणत्याही प्रकारची अडचण भासणार नाही. आपण सुचवलेल्या कामांचा आराखडा तयार ठेवा तसेच भराडी मंदिर पर्यटन दृष्ट्या विकसित करण्यासाठी निधीची उपलब्धता निश्चित केली जाईल तसेच ग्रामीण भागात आरोग्याचे प्रश्न मोठ्या प्रमाणात आहेत. विशेषतः त्यामुळे प्रत्येक गावात आरोग्य शिबीर आयोजित करून आरोग्याच्या दृष्टिकोनातून गरजूंना मदत करणार असे सांगितले. यावेळी मालवण गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांनी प्रशासकीय स्तरावरून सहकार्य करण्याची ग्वाही दिली.यावेळी सुरेश चौकेकर व बिंजेद्र गावडे यांनी आपल्या मनोगतामध्ये चौके गावातील विकासाची कामे पुर्ण करून मिळावीत अशी मागणी केली.यावेळी ज्येष्ठ नागरिक श्री.सदाशिव गावडे गुरूजी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी नवनिर्वाचित सदस्या अक्षता गावडे आणि मानसी भोगावकर यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहण्याचे अभिवचन दिले आणिसत्कारा बद्दल कृतज्ञता व्यक्त केली .कार्यक्रमामध्ये श्री दत्ता सामंत गटविकास अधिकारी श्री चव्हाण , माजी सरपंच राजा गावडे यांचाही सत्कार करण्यात आला .तसेच नवनिर्वाचित जि प पंचायत समिती सदस्यांचा सत्कार व्यापारी संघटना,चौके वावळ्याचे भरड भराडी मंडळ, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका ,चिरेखान संघटना यांच्या वतीने सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि उपस्थितांचे स्वागत सरपंच पी.के चौकेकर यांनी केले. सूत्रसंचालन संतोष गावडे यांनी केले तर ग्रामपंचायत अधिकारी श्री निकम यांनी आभार मानले. कार्यक्रमाला तंटामुक्ती अध्यक्ष नितीन गावडे,माजी सरपंच मधुकर चौकेकर ,सचिन आंबेरकर तसेच मंगेश पात्रे, मोहन गावडे ,दीनानाथ गावडे रमाकांत देसाई बंड्या गावडे, श्रीमती निरा सावंत, उदय गावडे ,विनायक गावडे, चिरेखाण संघटनेचे अध्यक्ष दत्ता गावडे, पोलीस पाटील रोहन चौकेकर,ग्रामपंचायत सदस्य ,कर्मचारी ,शासकीय, निम शासकीय कर्मचारी ,प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका आरोग्य सेवक , ग्राम संघ अध्यक्ष ,बचत गटाचे प्रतिनिधी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.