महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

चोर्ला मार्गाचे काम अडकले लालफितीत?

12:43 PM Dec 13, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मंजुरी मिळूनही काम रखडलेलेच; कंत्राटदाराने गाशा गुंडाळला, दिवसेंदिवस दुरवस्थेत पडतेय भर

Advertisement

वाळपई : बेळगावला जोडणारा जवळचा मार्ग असलेला जांबोटी मार्गे चोर्ला पणजी रस्त्याची पुरती दुरवस्था झाली आहे. असे असतानाही सरकारचे दुर्लक्ष झाले आहे  रस्ते विकास मंडळाने डोळेझाकपणा केला आहे. त्यामुळे शासनाला बळी हवेत का? असा संतप्त सवाल वाहनधारकांतून विचारण्यात येत आहे. रस्त्यावर पडलेले मोठमोठे ख•s, काही ठिकाणी तुटून गेलेला मार्ग, कुसमळीनजीकच्या मलप्रभा नदीवरील ब्रिटिशकालीन पुलही कोसळण्याच्या स्थितीत आहे. मागच्यावेळी या मार्गाला मंजुरी मिळाली असल्याचे सांगत केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर पुढे कोणत्याही हालचाली दिसत नाहीत शिवाय निविदा मिळालेल्या कंत्राटदाराने बेटनेजवळ जमा केलेले साहित्य हलवून गाशा गुंडाळला आहे. त्यामुळे पुन्हा हा मार्ग लालफितीत अडकल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

Advertisement

दुऊस्तासाठी मंजूर 3 कोटी निधी पाण्यात

पीरनवाडी व्हाया जांबोटी कणकुबी चोर्ला या कर्नाटक हद्दीतील मार्गाची दुर्दशा झाली आहे. याभागात तीन फुटाचे ख•s पडले असून, ठिकठिकाणी तुटून गेलेला मार्ग, त्यातून मार्ग काढणे म्हणजे मृत्यूचा सापळा बनला आहे. चिखले क्रॉस जवळील वळणार भला मोठ्ठा ख•ा पडला असून त्यातून मार्ग करण्यासाठी पंधरा मिनिटे लागत आहेत. छोट्या वाहनांना तर मोठी कसरत करावी लागत आहे. परिणामी अनेक वाहनांची यामुळे नुकसान होत आहे. कूसमळी पूल, कालमणी, बेटणे, कणकुबी, चोर्ला भागात मार्गावरून प्रवास करताना जीवघेण्या खड्यांचा सामना करावा लागत आहे. दोन महिन्यांपूर्वी चिखले फाटा ते चोर्लापर्यंतच्या मार्गाच्या दुऊस्तीसाठी 3 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, त्यानुसार अजिबात काम झाले नसून, कंत्राटदाराने पलायन केले आहे. त्यामुळे शासनाचा कोटींचा निधी पाण्यात गेला आहे.

शासनाचा प्रवाशांच्या जीवाशी खेळ!

आहे तेवढ्याच मार्गाचा विकास करायला कोणती अडचण आहे, या मार्गामुळे भागातील खेड्यांचा गोव्याचा प्रवास जवळचा होतो. शिवाय बेळगाव आणि कनकूंबी भागातील वीसएक खेड्यांना जोडणारा मुख्य मार्ग म्हणून ओळखल्या जातो. असे असताना केंद्र आणि राज्य सरकार या भागातील नागरिकांच्या जीवाशी खेळ करते का? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. परिणामी मार्गाची अवस्था पाहता प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे.

कोट

राष्ट्रीय बांधकाम विभागाकडे हा मार्ग वर्ग करण्यात आला असून, त्यांच्याकडून आहे तेवढ्याच मार्गाची योजना आखण्यात आली आहे. लवकरच या मार्गाचे काम मार्गी लागण्याची चिन्हे दिसत आहेत.

-राजेंद्र होणकांडे, अधिकारी,  बांधकाम खाते

गोव्याला जोडणारा जवळचा मार्ग तसेच आमच्यासाठी अत्यंत गरजेचा हा मार्ग आहे. गेल्या दहा वर्षांपासून आम्ही पाहतोय कोणती कोणती तरी अडचण निर्माण होत आहे. तात्काळ शासनाने याची दखल घेऊन काम मार्गी लावला पाहिजे.

- मंगेश नाईक, माजी ग्रा.पं.अध्यक्ष कणकुंबी.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article