वेगळ्या भूमिकांची निवड करतेय : तृप्ति
तृप्ति डिमरी या अभिनेत्रीला एका भूमिकेमुळे नॅशनल क्रश ठरण्याची संधी मिळाली. अॅनिमल चित्रपटातील तिच्या भूमिकेला पसंती मिळाली. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट यशस्वीही ठरला. यानंतर अभिनेत्रीच्या कारकीर्दीला नवे वळण मिळाले आणि तिला एकाहून एक सरस चित्रपटांच्या ऑफर्स मिळू लागल्या. तृप्तिने आता स्वत:च्या भूमिकांविषयी म्हणणे मांडले आहे.
तृप्ति आगामी काळात ‘धडक 2’ या चित्रपटात दिसून येणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धांत चतुर्वेदी दिसून येईल. ‘अॅनिमल’नंतर तृप्तिने अनेक आइटम साँग केले असून यामुळे तिची प्रतिमा बोल्ड ठरली आहे. जर मला कुठलीही भूमिका किंवा कहाणी पसंत पडली तर मी स्वत:चे 100 टक्के योगदान देण्याचा प्रयत्न करते. भले मग तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी होवो की न होवो. काही चित्रपट यशस्वी ठरतात तर काही नाही हे आतापर्यंत शिकले आहे, असे तिने सांगितले आहे.
मी जाणूनबुजून माझी बोल्ड प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करत नाही, परंतु वेगवेगळ्या भूमिका स्वीकारणे मला आवडत आहे. चित्रपटाच्या सेटवर कंटाळवाणा अनुभव घेण्याची माझी इच्छा नाही. याचमुळे व्यक्तिरेखांमध्ये काहीसे वेगळेपण मी शोधतेय, असे ती सांगते.