For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारत सरकारविरोधी खटला चोक्सीने घेतला मागे

06:48 AM Oct 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारत सरकारविरोधी खटला  चोक्सीने घेतला मागे
Advertisement

लंडन:

Advertisement

फरार उद्योजक मेहुल चोक्सीने लंडन उच्च न्यायालयात भारत सरकार आणि हंगेरियन महिला बार्बरा जाराबिक यांच्या विरोधात दाखल खटला मागे घेतला आहे. 23 मे 2021 रोजी अँटिग्वामध्ये हनिट्रॅपच्या कटाच्या अंतर्गत अपहरण करण्यात आल्याचा आरोप करत मेहुल चोक्सीने भरपाईदाखल कोट्यावधी पाउंडचा दावा केला होता. मेहुल चोक्सीने भारत सरकारवर हनिट्रॅपच्या कटाचा आरोप केला होता. भारत सरकारने 5 जणांसोबत मिळून आपले अँटिग्वा येथून डोमिनिकामार्गे भारतात आणण्यासाठी अपहरण करविले होते. यादरम्यान माझा छळ करण्यात आल्याचा दावाही चोक्सीने केला होता. परंतु चोक्सीने आता हा खटला मागे घेतला आहे. यामुळे त्याच्या प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेला वेग मिळण्याची शक्यता आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.