For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘रात अकेली है’मध्ये चित्रांगदा सिंह

06:10 AM Dec 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
‘रात अकेली है’मध्ये चित्रांगदा सिंह
Advertisement

रहस्यपटाचा ट्रेलर सादर

Advertisement

इन्स्पेक्टर जटिल या भूमिकेत नवाजुद्दीन सिद्दीकी पुन्हा परतला असून यावेळी तो एक सस्पेन्स-मर्डर मिस्ट्री चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणर आहे. नेटफ्लिक्सचा चित्रपट ‘रात अकेली है : द बंसल मर्डर्स’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला असून यात नवाजुद्दीन स्वत:च्या टीमसोबत बंसल परिवारात एकाचवेळी झालेल्या मृत्यूंचे रहस्य उलगडू पाहत आहे.

बंसल परिवाराच्या सर्व सदस्यांचा त्यांच्या घरातच निर्घृणपणे खून झाल्याचे आणि केवळ मीरा बंसल वाचल्याचे ट्रेलरमध्ये दिसून येते. आता हे खून कसे झाले, कुणी केले आणि यामागील कारण काय या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न इन्स्पेक्टर जटिल म्हणजेच नवाजुद्दीन करणार आहे. हा चित्रपट 19 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

Advertisement

हनी त्रेहानकडून दिग्दर्शित ‘रात अकेली है :द बंसल मर्डर्स’ हा 2020 मध्ये प्रदर्शित ‘रात अकेली है’चा सीक्वेल आहे. यावेळी चित्रपटात नवे प्रकरण आहे आणि कलाकारांचीही भर पडली आहे. चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत राधिका आपटे, चित्रांगदा सिंह, दीप्ति नवल, इला अरुण वाजपेयी, रेवती आशा केलुनी, रजत कपूर आणि संजय कपूर महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहे.

Advertisement
Tags :

.