For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पिंगुळीत 17 व 18 ऑक्टोबर रोजी चित्रकथी रामायण महोत्सव

04:32 PM Oct 15, 2024 IST | अनुजा कुडतरकर
पिंगुळीत 17 व 18 ऑक्टोबर रोजी चित्रकथी रामायण महोत्सव
Advertisement

महोत्सवात पाहायला मिळणार चित्रकथी परंपरा

Advertisement

कुडाळ -

सांस्कृतिक विभाग भारत सरकार यांच्या सहयोगाने व दायती लोककला संवर्धन अकादमी ( पिंगुळी ) यांच्यावतीने 17 व 18 ऑक्टोंबर रोजी पिंगुळी येथे चित्रकथी रामायण महोत्सव 2024 चे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव दोन दिवस चालणाऱ असून या महोत्सवात 14 ते 15 चित्रकथी सादर करणारे कलाकार सहभागी होणार आहेत.चित्रकथी या कला प्रकारावर आधारित असा होणारा महोत्सव हा इतिहासातील पहिलाच महोत्सव आहे. ,अशी माहिती दायती लोककला संवर्धन अकादमीचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय लोककलाकर गणपत मसगे यानी दिली.या महोत्सवाच्या माध्यमातून जिल्ह्यातील चित्रकथी सादर करणाऱ्या कलाकारांना एक उत्तम असे व्यासपीठ मिळावे. यासाठी या महोत्सवाचे आयोजन केले आहे. चित्रकथी कलाकार या महोत्सवात सहभागी होत आपली कला सादर करणार आहेत,असे श्री मसगे यांनी सांगितले.या महोत्सवाचा लाभ चित्रकथी प्रेमी विद्यार्थ्यांना, कलाप्रेमीना तसेच अभ्यासकांना होणार आहे. तसेच हा महोत्सव कुडाळ तालुक्याच्या सांस्कृतीक परंपरेत मोलाची भर पाडणार ठरणार आहे. या महोत्सवात वैशिष्ट पूर्ण अशी चित्रकथी परंपरा पाहायला मिळणार आहे,असेही ते म्हणाले.17 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी 5 वाजता उद्घाटन सोहळा होणार असून प्रमुख उद्घाटक म्हणून डॉ. श्री. ओमप्रकाश भारती ( भारत सरकार चे पूर्व सांस्कृतिक राजनिथीक तथा पूर्व निर्देशक ईजेडसी सी , कलकत्ता) उपस्थित राहणार आहेत. तसेच पिंगुळी सरपंच अजय आकेरकर, उपसरपंच सागर रणसिंग, जिल्हा ठाकर संघटनेचे अध्यक्ष शशांक आटक, पिंगुळी ठाकर ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष भगवान रणसिंग, ठाकर आदिवासी लोककला संवर्धन पर्यटन संस्था अध्यक्ष भास्कर गंगावणे, महापुरुष मित्र मंडळाचे अध्यक्ष गुंडू मसगे , दिग्दर्शक सिने लाईन प्रोडूसर साईनाथ दळवी ठाकरवाडी म्युझियमचे पदाधिकारी तुळशीदास मसगे , अच्युत मसगे, धोंडी ठाकूर उपस्थित राहणार आहेत.

Advertisement

चित्रकथी सादरीकरण सायंकाळी 6:30 वाजता लवंकुश ( सादरकर्ते - सुरेश रणसिंग व विश्वास रणसिंग ) 6:45 सीता स्वयंवर ( सादरकर्ते - शंकर मसके व शैलेश मसके ) , 7:30 पंचवटी (सादरकर्ते सखाराम गंगावणे व विवेक गंगावणे ) ,रात्री 8:15 सुंदरकांड ( सादरकर्ते - शिवदास मसगे व संस्कार मसके.
18 रोजी सायंकाळी 5 वाजता रामायण व चित्रकथी परंपरा चर्चासत्र होणार आहे.यात ओमप्रकाश भारती, सतीश लळीत, गणपत मसगे, गुंडू मसके ,तरुण भारत संवादचे सिंधुदूर्ग रत्नागिरी आवृत्तीचे संपादक शेखर सामंत, ना.बा.रणसिंग सहभागी होणार आहेत. 7.30 वाजता युद्धकांड (सादरकर्ते- विनायक मसगे व अमर मसगे ), रात्री 8 वाजता बालकांड ( सादरकर्ते- सुधाकर रणसिंग व आनंद ठाकूर ) , 8.30 वाजता ताटीका वध (सादरकर्ते लक्ष्मण मसके व विष्णू मसके ) असा कार्यक्रम आहे. चित्रकथी हा कलाप्रकार दहावीच्या अभ्यासक्रमामध्ये असल्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांनीही या महोत्सवाचा लाभ घ्यावा व कुडाळ तालुक्यासह जिल्ह्यातील नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहवे ,असे आवाहन संस्थाध्यक्ष श्री मसगे व ठाकरवाडी म्युझियमच्या टीमने केले आहे

Advertisement
Tags :

.