चिटणीस स्कूलला हॉकीत दुहेरी मुकुट
बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खात्याच्या वतीने चंदरगी क्रीडा स्कूलमध्ये घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय हॉकी स्पर्धेमध्ये जी. जी. चिटणीस स्कूलने दुहेरी मुकुट पटकाविला. माध्यमिक मुलींच्या अंतिम लढतीत जी. जी. चिटणीस स्कूलने ताराराणी खानापूर संघाचा 6-1 असा पराभव केला. या सामन्यांमध्ये आऊषी बसुरर्तेकरने 2, अस्मि कामतने 2, निशा दोड्डमणीने 2 गोल नोंदविले. प्राथमिक गटामध्ये चिटणीस स्कूलने विजया इंटरनॅशनल स्कूलचा पेनल्टी शूटआउट मध्ये 2-0 असा पराभव केला. चिटणीस स्कूलतर्फे सायली पाटील व वैभवी राजमाने यांनी प्रत्येकी एक गोल नोंदविला.
वरील दोन्ही संघ विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. माध्यमिक गटामध्ये कर्णधार सेजल भावी, वैष्णवी इतनाळ, श्रेया गोलीहळी, महेक बिस्ती, आऊषी बसुरर्तेकर, अस्मि कामत, निशा दोड्डमणी, अतिथी शेट्टी, वैष्णवी नाईक, तनिष्का असलकर, भूमी लटकन यांचा समावेश आहे. प्राथमिक गटामध्ये कर्णधार श्रेया बनकर, स्नेहा पादी, संचिता पाटील, अमृता नंदगडकर, सेजल नंद्याळकर, आराध्या परीत, माहीन मुल्ला, उमेहनी मोकाशी, सेजल पाटील, सोनाक्षी चापकारे, अनुष्का मराठे, प्रियंका चौधरी यांचा सहभाग आहे. वरील दोन्ही संघाला क्रीडा शिक्षक जयसिंग धनाजी यांचे मार्गदर्शन तर शाळेचे मुख्याध्यापिका डॉ. नवीना शेट्टीगार शाळेचे अध्यक्ष अॅड. चंद्रहास अणवेकर तसेच शिक्षकवर्गाचे प्रोस्ताहन लाभत आहे.