सिंधुदुर्गातील चिरेखाण व्यावसायिकांचा उद्या कसाल येथे मेळावा
चौके/वार्ताहर
सिंधुदुर्ग जिल्हातील सर्व चिरेखाण व्यावसायिकांचा मेळावा बुधवार दिनांक १५ जानेवारी रोजी सकाळी ठीक १०:०० वाजता सिद्बिविनायक मंगल कार्यालय कसाल बाजारपेठ या ठिकाणी आयोजित करण्यात आला असून जिल्हातील सर्व चिरेखाण व्यावसायिकांनी आपला व्यवसाय बंद ठेऊन या मेळाव्याला उपस्थित रहावे.असे आवाहन जिल्हा चिरेखाण संघटना अध्यक्ष श्री.संतोष गावडे व सचिव सुबोध पालव यांनी केले आहे.यावेळी या मेळाव्यामध्ये सुप्रिम कोर्टात चालू असलेल्या केस संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.तसेच जुनी जिल्हा कार्यकारणी बदलून नवीन जिल्हा कार्यकारणी स्थापन करण्यात येणार आहे. विशेष जी केस चालू आहे त्याबाबत चर्चा करुन या केससाठी लागणार्या आर्थिक विषयावरती चर्चा करुन काही महत्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत चिरेखाण व्यवसायाला सुप्रिम कोर्टामध्ये स्थगिती असल्यामुळे या मेळाव्यामध्ये पुढील रणनिती ठरविण्यात येणार आहे.तरी जिल्हातील सर्व चिरेखाण व्यावसायिकांनी आपला व्यवसाय या दिवशी बंद ठेऊन या मेळाव्याला हजर रहावे असे आवाहन अध्यक्ष संतोष गावडे व सचिव सुबोध पालव यांनी केले आहे.