Ratnagiri News : चिपळूण बाजारपेठेतून सात हजाराचा गुटखा जप्त
चिपळूण : पानगल्ली येथे स्वामी जनरल पान शॉप या दुकानामधून ७ हजार ५४६ रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. शहरबाजारपेठेतील ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाने केली आहे. यामुळे खुलेआम गुटखा विक्री करणाऱ्या विक्रेत्याचे धाबे दणाणले आहे.
याप्रकरणी प्रवीण सदानंद बांदेकर (५३, कापसाळ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त भाग्यश्री अण्णासाहेब परदेशी (३१) यांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजश्री बांदेकर याला मानवी आरोग्यास अपायकारक असल्याचे माहिती असतानाही त्याने प्रतिबंधित असलेला गुटखा विक्रीसाठी साठवणूक करून ठेवला होता. यावेळी अन्न व औषण प्रशासनाने टाकलेल्या धाडीत प्रवीण याच्याकडे हा साठा आढळून आला.
त्याच्याकडून विमल पान मसाला, आरएमडी पान मसाला यासह अन्य असे इतर सुगंधीत पान मसाला पदार्थाचे ५ बॉक्स असा एकूण ७हजार ५४६ रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. दरम्यान, या कारवाईनंतर बाजारपेठेत खुलेआम गुटखा विक्री करणाऱ्यांचे धाबे मात्र चांगलेच दणाणले आहे.
या कारवाईचे अनेकांकडून स्वागत होत असून अशा धडक कारवाया यापुढे कायम सुरु राहाव्यात अशी मागणी देखील होत आहे.