Chiplun News: घरातून २ लाख ८ हजारांचे दागिने लंपास, तरुणीवर गुन्हा दाखल
01:13 PM Jun 18, 2026 IST | NEETA POTDAR
Advertisement
पाग कास्कर आळी येथील प्रकार
चिपळूण : शहरातील पाग कास्करआळी येथील शाबिरा मंझिल या अपार्टमेंटमधील एका सदनिकेतून २ लाख ८ हजार ९९७ रुपये किमतीचे दागिने लांबवल्याची घटना ५ ते १६ जून या कालावधीत घडली. याप्रकरणी सानिया फारुख झारे (१८, पाग चिपळुणातील पाग कास्करआळी येथील प्रकार, तरुणीवर गुन्हा कास्करआळी) हिच्यावर चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची फिर्याद नईमा रफिक झारे (५८, शाबिरा मंझिल, पाग कास्करआळी) यांनी दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नईमा झारे यांच्या राहत्या सदनिकेतून सानिया झारेने बेडरूमचा बंद दरवाजा उघडून कपाटातील १ लाख २७ हजार ६०२ रुपये किमतीचा नेकलेस, ४३ हजार ५०७ व ३६ हजार २७९ रुपये किमतीच्या दोन अंगठ्या, १ हजार ५२९ रुपये किमतीच्या नाकातील पुली असा एकूण २ लाख ८ हजार ९१७ रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. या चोरी प्रकरणी सानिया झारे हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Advertisement
Advertisement
.