For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दुप्पट पैशाचे आमिष दाखवून १० लाखाची फसवणूक; चिपळुणात एकावर गुन्हा दाखल

05:44 PM Jul 22, 2024 IST | Abhijeet Khandekar
दुप्पट पैशाचे आमिष दाखवून १० लाखाची फसवणूक  चिपळुणात एकावर गुन्हा दाखल
Chiplun fraud
Advertisement

चिपळूण प्रतिनिधी

फायनांन्सशियल कंपनीत पैसे गुंतवल्यास त्याचा दुप्पट फायदा होईल, असे आमिष दाखवून यातूनच एकाची तब्बल 10 लाखाला फसवणूक केल्याचा प्रकार 2020 ते 21 या कालावधीत घडला. याप्रकरणी फसवणूक करणाऱ्यावर चिपळूण पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

अयुब अहमद परकार (कालुस्ते खुर्द) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबतची फिर्याद दिलनवाज करामत बेबल (44, चिपळूण) यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अयुब परकार याने दिलनवाज बेबल यांना 2020 ते 2021 या कालावधीत वेळोवेळी आ. आर. र्क्लड फायनांन्सशियल सर्व्हिस आणि युरो लिंक व्हेन्चर या कंपन्यामध्ये पैसे गुंतवून त्याचा दुप्पट फायदा मिळवून देतो, असे आमिष दाखवले. त्यासाठी परकार याने बेबल यांच्याकडून 10 लाख रुपये घेतले. मात्र ही रक्कम त्यांना परत केली नाही. हा प्रकार बेबल यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याप्रकरणी चिपळूण पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार परकार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.