Ratnagiri News : ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने केली महिलेस मारहाण
12:25 PM May 30, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
Advertisement
चिपळूण : कुटुंबियासमवेत गावी आलेली महिला चंद्रकला चंद्रकांत सावंत (५०, रिक्टोली) यांच्या घरातील नळास पाणी येत नसल्याने त्यांनी याची विचारणा ग्रामपंचायत कर्मचारी सुभाष सर्जेराव शिंदे (५०, रिक्टोली) याच्याकडे केली. त्याचा राग आल्याने शिंदे याने सावंत यांना काठीने मारहाण केल्याची घटना २४ मे रोजी तालुक्यातील रिक्टोली येथे घडली.
याप्रकरणी कर्मचाऱ्यावर गुरुवारी अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद चंद्रकला चंद्रकांत सावंत यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रकला सावंत या मे महिन्याची सुट्टी असल्याने आपल्या कुटुबियांसमवेत रिक्टोली गावी आल्या होत्या. मात्र त्या आल्यापासून त्यांच्या राहत्या घराच्या नळाला पाणी आले नव्हते.
याबाबत सावंत यांनी त्यांच्या राहत्या घरासमोरुन जात असलेला कर्मचारी शिंदे याला 'नळाला पाणी कधी सोडणार आहेस' असे विचारले. याचा त्याला राग आला व त्याने सावंत यांना शिवीगाळ करून सावंत यांना मारहाण केली. या प्रकरणी शिंदे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.
Advertisement
Advertisement