महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

चिपी विमानतळाचे सबलीकरण व्हावे

04:25 PM Jun 29, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

राजन तेलींची केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांकडे निवेदनाद्वारे मागणी

Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

Advertisement

चिपी विमानतळ प्रकल्प हा सिंधुदूर्ग जिल्हा पर्यटन विकासाचा मानबिंदू आहे. सदरचे विमानतळ सुव्यवस्थितरित्या सुरू राहणे हे जिल्हयाच्या विकासाला अधिक गती देणारे आहे. सदय स्थितीत या प्रकल्पाचे सबलीकरण गरजेचे आहे. अशी मागणी निवेदनाद्वारे केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे निवेदनाद्वारे भाजपचे नेते तथा माजी आमदार राजन तेली यांनी केली आहे. त्यांनी दिलेल्य निवेदनात म्हटले आहे की चिपी विमानतळाला योग्य प्रतिसाद मिळवायचा असेल तर दरम्यानच्या परिसरात महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून उदयोग खात्यामार्फत एमआयडीसी निर्मितीला चालना मिळावी.तसेच परिसरातील शेतक-यांच्या संमतीने एखादी एमआयडीसी सुरू करता येईल का याची पाहणी करणे गरजेचे आहे. केंद्रसरकारच्या उड्डाण योजनेअंतर्गत आपल्याकडे ही विमानसेवा सुरू आहे. मुंबई ते चिपी तिकीट 40 टक्के कमी मध्ये उपलब्ध होत आहे. केंद्र सरकारकडे पुढील काही वर्षही विशेष सेवा चालू रहावी यासाठी प्रस्ताव मांडावा.

सिंधुदूर्ग जिल्हयाच्या सीमेवर मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट सुरू झाला आहे. तिथे प्रतिदिन विमान उड्डाण सेवा जास्त व माफक दर असल्याने तिथे प्रवाशांची संख्या जास्त आहे. चिपी एअरपोर्टवरील तिकीट दर कमी ठेवला आणि उड्डाण संख्या वाढली तर प्रवासी संख्या नक्की वाढेल, यादृष्टीने विचार व्हावा.एअरपोर्ट ऑथोरिटी मार्फत उत्तर गोव्याला जाणा-या प्रवाशांसाठी हवाई कॉम्बो प्लॅनचा पर्याय दयावा, त्यासाठी समोरील खाडीत जेटी उभारून जलप्रवास सोय / परवानगी उपलब्ध करून दयावी.बॅरिस्टर नाथ पै. विमानतळाला नाईट लॅन्डींगची परवानगी असूनही कंपनीला परवडत नसल्यामुळे ती चालू करत नाही तरी आपण यामध्ये विशेष लक्ष घालून यावर मार्ग काढावा. असे त्यांनी सुचित केले आहे यावेळी श्री मोहोळ यांनी निश्चितपणे आपण याकडे लक्ष घालू असे आश्वासन दिले.

Advertisement
Tags :
# tarun bharat news # rajan teli # murlidhar mohol #
Next Article