चिपडे सराफ अँड सन्सच्या मोती प्रदर्शनाला उदंड प्रतिसाद
बेळगाव : चिपडे सराफ अँड सन्स, नागाळा पार्क, कोल्हापूर यांच्यावतीने मोती महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. सदर महोत्सव हिंदवाडी येथील महावीर भवनमध्ये 8 नोव्हेंबरपासून सुरू आहे. या महोत्सवाला बेळगाववासियांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. ग्राहकांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन 1 दिवसाची वाढ करत 11 नोव्हेंबरपर्यंत हा महोत्सव चालणार आहे. महोत्सवात विविध प्रकारचे दागिने उपलब्ध करण्यात आले आहेत.
मोती महोत्सव 8 ते 10 नोव्हेंबरअखेर आयोजित करण्यात आला आहे. पहिल्या दिवसापासूनच ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद लाभत असून, खरेदीही तितकीच होत आहे. चिपडे सराफ अँड सन्सकडून महोत्सवास येणाऱ्या ग्राहकांसाठी विशेष भेटवस्तूही देण्यात येत आहेत. प्रत्येक खरेदीदाराला भेटवस्तू देण्यात येत आहे. 4 हजार रुपयांच्या खरेदीवर एक साडी मोफत व 10 हजारांच्या खरेदीवर बालाजी पैठणी भेटस्वरुपात देण्यात येत आहे.
या महोत्सवात मदरपला, जयपुरी, जोधपुरी, कारवारी यासह अँटीक कलेक्शन आणि झेन जी दागिन्यांचे कलेक्शनही उपलब्ध करून देण्यात आले आहे. चांगल्या दर्जाचे व माफक दरात बेळगावकरांना दागिने उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने प्रथमच चिपडे सराफ अँड सन्सकडून बेळगावमध्ये मोती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्राहकांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन महोत्सवात आणखी एक दिवसाची वाढ करण्यात आली आहे. यापुढेही अशाच प्रकारचे महोत्सव भरविण्यात येणार असल्याचे चिपडे सराफ अँड सन्सकडून सांगण्यात आले.
चिपडे सराफ अँड सन्सची 1904 मध्ये स्थापना करण्यात आली. चिपडे कुटुंबीयांची चौथी पिढी या व्यवसायात कार्यरत असून, हा व्यवसाय सुरू करून शतकपूर्ती होऊन 121 वर्षे पूर्ण झाली आहेत. या दरम्यान ग्राहकांना आकर्षक वाटणारे दागिने उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ग्राहकही विश्वासाने चिपडे सराफ अँड सन्सकडून दागिन्यांची खरेदी करतात. बेळगाव महोत्सवातही ग्राहकांना आकर्षित करणारे विविध प्रकारचे दागिने उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याचा लाभ घेण्याचे आवाहन चिपडे सराफ अँड सन्सकडून करण्यात आले आहे.