टाटा इलेक्ट्रॉनिक्सची तैवानी कंपनीसोबत चीप निर्मिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
टाटा इलेक्ट्रॉनिक्सने तैवानमधील पॉवरचीप सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशनसोबत नुकताच एक करार केला आहे. या अंतर्गत तैवानी कंपनी टाटा इलेक्ट्रॉनिक्ससोबत येथे निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी मदत करणार असल्याचे समजते. धोलेरा येथे सदरचा कारखाना उभारण्यात येणार असून यासाठी जवळपास 91 हजार कोटी रुपये गुंतवणूक करणार असल्याचीही माहिती पुढे येते आहे.
टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी ही माहिती दिली आहे. सध्याला चिप, सेमीकंडक्टरची वाढती मागणी पाहता अनेक कंपन्या भारतात येण्यासाठी सज्ज झाले आहेत. टाटा तैवानमधील कंपनीसोबत प्रकल्प साकारणार आहे.
काय म्हणाले चेअरमन
एन. चंद्रशेखरन म्हणाले, आम्ही जागतिक ग्राहकांची सेवा करण्यासाठी वाढत्या सेमीकंडक्टरच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहोत. त्याकरीता तैवानी कंपनीसोबत एक करार करण्यात आला आहे. सदरच्या नव्या कारखान्याबाबत व चीप उत्पादनाबाबत कंपनीशी सविस्तर चर्चाही केली आहे. टाटा समूहाच्या या निर्मिती प्रकल्पांतर्गत जवळपास 1 लाख पेक्षा अधिक जणांना नोकरीची संधी दिली जाणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.