मनसे बांदा शहराध्यक्षपदी चिन्मय नाडकर्णी
प्रतिनिधी
बांदा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिफारशीनुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेना बांदा शहराध्यक्षपदी चिन्मय नाडकर्णी यांची नियुक्ती करण्यात आलीय . महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कार्यकारणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेल्या वर्षी बरखास्त केली होती . बांदा शहरात एक युवा उद्योजक तथा पदवीधर चिन्मय नाडकर्णी यांची आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस तथा सिंधुदुर्ग पक्ष निरीक्षक यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन बांदा शहराध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्याजवळ देण्यात आलेली आहे. एक सुशिक्षित चेहरा बांदा शहरात दिल्यामुळे मनसेमध्ये नवचैतन्य निर्माण झालेय . आगामी मिशन 2024 निवडणुकांमध्ये मनसे जोमाने उतरेल असं मत सावंतवाडी तालुका अध्यक्ष मिलिंद सावंत यांनी म्हटले. यावेळी व्यासपीठावर मनसेचे सरचिटणीस तथा पक्ष निरीक्षक संदीप दळवी जिल्हाध्यक्ष अनिल केसरकर विधानसभा संपर्क अध्यक्ष महेश परब, उपजिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ, कुणाल किनळेकर, जिल्हा सचिव बाळा पावस्कर, सावंतवाडी विधानसभा सचिव गुरुदास गवंडे, कुडाळ विधानसभा सचिव सचिन सावंत, सावंतवाडी मनसे संपर्क अध्यक्ष अमित नाईक, सावंतवाडी तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत ,विद्यार्थी सेना सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष केतन सावंत, वेंगुर्ले माजी तालुकाध्यक्ष सनी बागकर, राकेश परब, सतीश आकेरकर, अभिमन्यू गावडे, महादेव तांडेल, राजेश मामलेदार, आरोंदा ग्रामपंचायत सदस्य नरेश देऊलकर, विष्णू वसकर, काशीराम गावडे, विजय बांदेकर, अतुल केसरकर, साहिल तळकटकर, पांडुरंग बुगडे, अमोल नाईक, स्नेहा प्रशांत कुडाळकर, मंदार चोपडेकर, सहदेव फोडनाईक, अनिकेत दळवी, हर्षद कांबळे, विशाल दळवी आदि पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.