For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाकिस्तानी दहशतवाद्यांकडे चिनी अल्ट्रा सेट

06:46 AM Jun 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
पाकिस्तानी दहशतवाद्यांकडे चिनी अल्ट्रा सेट
Advertisement

भारतात मोठा हल्ला घडवून आणण्याचा होता कट : रडारपासून वाचण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर

Advertisement

वृत्तसंस्था/ जम्मू

चीनकडून पाकिस्तानी सैन्याला देण्यात आलेले अत्याधुनिक दूरसंचार उपकरण ‘अल्ट्रा सेट’ आता जम्मू-काश्मीरमध्ये सक्रीय दहशतवाद्यांपर्यंत पोहोचले आहे. भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या रडारपासून वाचण्यासाठी पाकिस्तानी सैन्याने अल्ट्रा सेट या दहशतवाद्यांना पुरविली आहेत. बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोरमध्ये मारले गेलेले दोन्ही दहशतवादी आणि पुंछ जिल्ह्याच्या सुरनकोट येथील चकमकीत मारले गेलेल्या 4 दहशतवाद्यांकडून ही अल्ट्रा सेट हस्तगत झाले होते.

Advertisement

पाकिस्तानी सैन्य जम्मू-काश्मीरमध्ये अस्थिरता आणि हिंसा फैलावण्यासाठी दहशतवाद्यांना आता चीनकडून निर्मित उपकरणे देखील पुरवत आहे. या उपकरणांचा वापर पाकिस्तानी सैन्याकडून देखील होतो. अल्ट्रा सेट रेडिओ वेव्ह्जच्या आधारावर काम करतो. हे उपकरण चीनच्या उपग्रहावर आधारित आहे. यात कॉलिंग आणि मेसेजिंग दोन्ही सुविधा आहेत. दोन अल्ट्रा सेट परस्परांमध्ये थेट जोडलेले नसतात. प्रत्येक अल्ट्रा सेट  पाकिस्तानातील मास्टर सर्व्हरशी कनेक्टेड असतो. या सर्व्हरमध्ये संदेशांना डिकोड करत संबंधित ठिकाणी उपग्रहाच्या माध्यमातून पोहोचविले जाते.

मोबाइल अन् रेडिओचे सेटचे मिश्रण

अल्ट्रा सेट उपकरण मोबाइल फोन आणि विशेष रेडिओ सेटचे मिश्रण आहे. याच्या वापरासाठी ग्लोबल सिस्टीम फॉर मोबाइल (जीएसएसम) किंवा कोड डिव्हिजन मल्टीपल अॅक्सेस (सीडीएमए) यासारख्या पारंपरिक मोबाइल तंत्रज्ञानाची गरज भासत नाही. याचमुळे अल्ट्रासेटद्वारे पाठविण्यात आलेले संदेश भारतीय सैन्य आणि सुरक्षा दलांना ट्रेस करता येत नाहीत. जम्मू-काश्मीरमध्ये सक्रीय पाकिस्तानी दहशतवाद्यांकडे ही अल्ट्रा सेट उपकरणे मिळणे घुसखोरविरोधी मोहीम राबवित असलेल्या सुरक्षा दलांसाठी चिंतेचा विषय ठरला आहे.

Advertisement
Tags :

.