For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीयांसाठी चीनच्या पायघड्या...

06:12 AM Apr 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
भारतीयांसाठी चीनच्या पायघड्या
Chinese shoes for Indians...
Advertisement

चालू वर्षात 85 हजार भारतीयांना व्हिसा प्राप्त : अमेरिकेच्या व्यापार युद्धादरम्यान नवी चाल

Advertisement

वृत्तसंस्था/ बीजिंग

अमेरिकेसोबत सुरू असलेल्या व्यापार युद्धादरम्यान चीन भारतीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. भारतातील चिनी दूतावास आणि वाणिज्य दूतावासांनी 9 एप्रिलपर्यंत 85 हजारहून अधिक भारतीय नागरिकांना व्हिसा जारी केले आहेत. भारतातील चिनी राजदूत शु फेईहोंग यांनी अधिकाधिक भारतीयांना चीनमध्ये येऊन देशाला भेट देण्याचे आवाहन केले. ‘सुरक्षित आणि मैत्रीपूर्ण चीन जाणून घेण्यासाठी देशाला भेट देणाऱ्या भारतीयांचे स्वागत आहे’, असे ट्विट चिनी राजदूत शु फेईहोंग यांनी केले.

Advertisement

अलिकडच्या काही महिन्यांत चीनने भारतीय नागरिकांसाठी व्हिसा प्रक्रिया नियमांमध्ये अनेक शिथिलता आणल्या आहेत. नवीन चिनी व्हिसा नियमांमध्ये अनिवार्य ऑनलाईन अपॉइंटमेंट रद्द करणे आणि व्हिसा शुल्कात कपात करणे समाविष्ट आहे. दोन्ही देशांमधील प्रवास सुलभ करण्यासाठी ही पावले उचलली जात आहेत. मार्चच्या सुरुवातीलाही चीनच्या राजदूतांनी एक आकडेवारीचा तपशील जारी केला होता. मार्चपर्यंत चीनने भारतीयांना 50,000 हून अधिक व्हिसा जारी केले होते. 2024 मध्ये किती भारतीय पर्यटकांनी चीनला भेट दिली याची आकडेवारी सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर उपलब्ध नाही. तत्पूर्वी 2023 मध्ये तब्बल 1,80,000 हून अधिक चिनी व्हिसा जारी करण्यात आले होते.

भारतीय पर्यटकांसाठी विविध सवलती

ऑनलाईन अपॉइंटमेंटची आवश्यकता नाही : चिनी व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या भारतीयांना आता सक्तीने ऑनलाईन अपॉइंटमेंट घेण्याची आवश्यकता नाही. यामुळे व्हिसा अर्ज प्रक्रिया जलद आणि सोपी होईल. बायोमेट्रिक सूट : कमी कालावधीसाठी चीनला प्रवास करू इच्छिणाऱ्या भारतीय नागरिकांना आता त्यांचा बायोमेट्रिक डेटा सादर करण्याची आवश्यकता नाही. साहजिकच व्हिसा प्रक्रियेचा वेळ कमी होईल. जलद आणि सोपी प्रक्रिया : व्हिसा मंजुरी प्रणाली जलद करण्यासाठी, चीनने मंजुरीच्या वेळापत्रकात शिथिलता आणल्यामुळे प्रक्रिया जलद झाली आहे.

व्हिसा शुल्कात कपात : अधिकाधिक भारतीय पर्यटकांना चीनमध्ये आकर्षित करण्यासाठी व्हिसा शुल्क देखील कमी करण्यात आले आहे.

पर्यटन प्रोत्साहन : भारतातील चिनी दूतावास अधिकाधिक भारतीय प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी चिनी पर्यटनाला प्रोत्साहन देत आहे.

Advertisement
Tags :

.