For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चीनच्या अध्यक्षांनी पुढे केला मैत्रीचा हात

06:54 AM Apr 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
चीनच्या अध्यक्षांनी पुढे केला मैत्रीचा हात
Advertisement

ड्रॅगन-हत्ती टँगोच्या स्वरुपात मजबूत व्हावेत संबंध

Advertisement

वृत्तसंस्था/ बीजिंग

चीनने पुन्हा एकदा भारताच्या दिशेने मैत्रीचा हात पुढे केला आहे. चीन आणि भारताने एकत्र येत काम करण्याची गरज आहे. दोन्ही देशांनी संबंधांना ड्रॅगन-हत्ती टँगोच्या स्वरुपात स्वीकारले पाहिजले. हे आमच्या प्रतिकात्मक प्राण्यांदरम्यानचे नृत्य आहे असे चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी म्हटले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना चीन-भारताच्या राजनयिक संबंधांना 75 वर्षे झाल्यानिमित्त पाठविलेल्या शुभेच्छा संदेशात जिनपिंग यांनी ही भूमिका मांडली आहे. यावेळी राष्ट्रपती मुर्मू यांनीही चीनच्या अध्यक्षांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Advertisement

शेजाऱ्यांनी शांततापूर्ण पद्धतीने सह-अस्तित्वाचे मार्ग शोधावेत. प्रमुख आंतरराष्ट्रीय प्रकरणांमध्ये संचार अणि समन्वय वाढविणे, सीमावर्ती क्षेत्रांमध्ये संयुक्त स्वरुपात शांततेचे रक्षण करण्यास आम्ही तयार आहोत असे जिनपिंग यांनी स्वत:च्या संदेशात नमूद केले आहे.

चीन आणि भारत दोन्ही प्राचीन संस्कृती, प्रमुख विकसनशील देश आणि ग्लोबल साउथचे महत्त्वपूर्ण सदस्य स्वत:च्या आधुनिकीकरणाच्या प्रयत्नांच्या महत्त्वपूर्ण टप्प्यात आहेत. चीन आणि भारतासाठी परस्पर कामगिरीचे आधार होणे आणि ड्रॅगन-हत्ती टँगो’ साकार करणे योग्य पर्याय असल्याचे दोन्ही देशांच्या संबंधांचा विकास दर्शविते, हे दोन्ही देश आणि त्यांच्या लोकांच्या मूलभूत हितांचे पूर्णपणे रक्षण करत असल्याचे उद्गार राष्ट्रपती मुर्मू यांनी काढले आहेत.

स्थिर, पूर्वानुमानित आणि मैत्रिपूर्ण द्विपक्षीय संबंधांमुळे दोन्ही देश आणि जगाला लाभ होणार असल्याचे मुर्मू यांनी म्हटले आहे. याचबरोबर चीनचे पंतप्रधान ली कियांग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील शुभेच्छा संदेशांचे आदान-प्रदान केले आहे.

मागील वर्षी सुधारले संबंध

भारत आणि चीनने मागील वर्षी चर्चेनंतर एका कराराच्या अंतर्गत पूर्व लडाखच्या दोन ठिकाणांहून सैनिकांची वापसी सुनिश्चित केली. यामुळे 4 वर्षांपेक्षा अधिक काळापासून दोन्ही देशांदरम्यान असलेला तणाव बऱ्याचअंशी कमी झाला. कराराला अंतिम स्वरुप दिल्यावर मोदी आणि जिनपिंग यांनी 23 ऑक्टोबर रोजी कजान येथे चर्चा केली होती. या बैठकीत दोन्ही देशांनी विविध स्तरांवर चर्चा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि वांग यांनी 18 डिसेंबर रोजी 23 वी विशेष प्रतिनिधी चर्चा केली होती.

डॅगन-हत्ती टँगोचा अर्थ

चीनला अनेकदा ड्रॅगन असे संबोधिले जाते, कारण चिनी संस्कृतीत ड्रॅगनला एक शक्तिशाली, भाग्यशाली आणि शुभ जीव मानले जाते, जो शक्ती, भाग्य आणि यशाचे प्रतीक आहे. दुसरीकडे हत्तीला भारताशी धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक कारणांमुळे जोडले जाते. तर टँगो या इंग्रजी शब्दाचा अर्थ मैत्रिपूर्ण संबंध किंवा नृत्य असा होतो.

Advertisement
Tags :

.