केसांची भाजी खात आहेत चीनचे लोक
वस्तुस्थिती जाणून घेतल्यावर व्हाल चकीत
चीनच्या चेंगदूमध्ये रस्त्यांवर लोकांना डोक्यावरील केस खायला दिले जात आहेत. तेथे चालत्या फिरत्या लोकांना केसांचा गुच्छसारख्या दिसणारी गोष्ट खाताना पाहू शकता. सध्या हे अजब खाणे इंटरनेटवर अत्यंत व्हायरल होत आहे. माणसांच्या केसांच्या गुच्छासारखी दिसणारी ही गोष्ट चीनमधील नव्sढ स्ट्रीट फूड आहे. प्रथमदृष्ट्या जणू माणसांचे केस खात असल्याचे त्याच्याकडे पाहून वाटते. या स्ट्रीटफूडचे नाव फा कै किंवा फैट चोय ओ. हे एकप्रकारचे सुके सायनोबॅक्टीरियम आहे जे दीर्घकाळापासून चिनी व्यंजनांचा हिस्सा राहिले आहे. हे बहुतांशकरून चीनमध्ये गांसू, शांक्सी, किंगहाई, झिंजियांग आणि इनर मंगोलिया यासारख्या शुल्क आणि ओसाड वाळवंटी भागात उगवते आणि कापणीनंतर त्वरित हवेत सुकवून त्याला तयार केले जाते.
रंग अन् आकारामुळे अजब
स्वत:चा दाट रंग आणि फायबरच्या आकारामुळे याला सर्वसाधारणपणे ‘केसयुक्त भाजी’च्या स्वरुपात ओळखले जाते. फा कै चे शास्त्राrय नाव नोस्टॉक फ्लेगेलिफॉर्म आहे. अनेकदा विविध शोरबा आणि सूपमध्ये काळ्या शेवयाच्या स्वरुपात याला सर्व्ह केले जाते आणि नववर्षाच्या पूर्वसंध्येला सौभाग्यासाठी हे वाढण्यात येते. फॅट चोयला याचे पोटनाव ‘केसांची भाजी’ मिळाली आहे. कारण हे सुकल्यावर काळ्या केसांच्या गाठीप्रमाणे दिसून येते. परंतु जेव्हा ते सूपमध्ये मिसळले जाते, तेव्हा ते काळ्या नुडल्सप्रमाणे दिसून येते. परंतु चेंगदूमध्ये काही स्ट्रीट फूड विक्रेत्यांनी अलिकडेच पॅट चोयला शिजविण्याची एक नवी पद्धत तयार केली असून ती याच्या केसांच्या स्वरुपाला कायम राखते. फा कै के एक तुकड्याला बारबेक्यू करू शकता आणि मग त्याला तप्त सॉससोबत सीजन करू शकता. मग याला काळ्या केसांच्या एका तुकड्याप्रमाणे खाता येते. हे दिसण्यास अजब वाटते, परंतु याला खाणारे याच्या स्वादाला दाद देत असतात.