For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चिनी कंपनीकडून ‘डीपसीक’चे अनावरण

06:02 AM Dec 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
चिनी कंपनीकडून ‘डीपसीक’चे अनावरण
Advertisement

वृत्तसंस्था / बीजिंग

Advertisement

कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात चीनने आघाडी घेतल्याचे दिसत आहे. चीनच्या एका कंपनीने या तंत्रज्ञानावर आधारीत ‘डीपसीक व्ही 3’ नामक कृत्रिम बुद्धिमत्तेचे ‘ओपन सोर्स’ साधन बाजारात आणले आहे. शुक्रवारी या साधनाचे लाँचिंग करण्यात आले. या कंपनीचे नाव ‘डीपसीक’ हेच आहे, अशी माहिती देण्यात आली. या साधनाचा उपयोग विविध कारणांसाठी केला जाऊ शकतो.

या साधनात 671 अब्ज शक्यता पडताळता येतात. याचा उपयोग टेक्स्ट तयार करणे, कोड तयार करणे आणि त्यासंबंधीची इतर कामे करणे यासाठी करता येतो. आतापर्यंत निर्माण करण्यात आलेल्या अशा प्रकारच्या कोणत्याही साधनापेक्षा या चीनी साधनाची क्षमता अधिक आहे, असे प्रतिपादन करण्यात आले आहे. हे साधन एमओई आर्किटेक्चरच्या विविध साधनांच्या मिश्रणातून तयार करण्यात आले आहे. अनेक न्यूट्रल नेटवर्कस्चा उपयोग या साधनाच्या माध्यमातून एकाच वेळी करण्यात येऊ शकतो. प्रत्येक न्यूट्रल नेटवर्कमध्ये 34 अब्ज पॅरॅमीटर्स असतात.

Advertisement

भाडे अत्यंत कमी

अशा साधनांचा उपयोग करण्यासाठी उपयोगकर्त्याला अत्यंत कमी भाडे द्यावे लागणार आहे. हे भाडे केवळ 2 डॉलर प्रति जीपीयू असेल. अमेरिकेतील बड्या एआय कंपन्यांनी विकसित केलेल्या अशाच साधनांचे भाडे अनेक दशलक्ष डॉलर्स असू शकते. या साधनाचा उपयोग करण्यासाठीचे प्रशिक्षणही अत्यंत कमी दरात उपलब्ध केल्याचे प्रतिपादन डीपसीक या कंपनीने केले आहे. त्यामुळे हे साधन अमेरिकन कंपन्यांसमोर मोठे आव्हान उभे करु शकेल, असे तज्ञांचे मत आहे.

इतर साधनांना टाकले मागे

या चिनी साधनाने जगातील इतर साधनांना वेग आणि उपयुक्तता या दोन्ही संदर्भांमध्ये मागे टाकले आहे, असा कंपनीचा दावा आहे. सध्या जगात केवळ अँथ्रोपिक्स क्लाऊड 3.5 सॉनेट हे एकच साधन असे आहे, की जे डीपसीकच्या या नव्या साधनाला अनेक निकषांवर मागे टाकू शकते. एमएमएलयू-प्रो, आयएफ-ईव्हल, जीपीक्यूए-डायमंड एसईडब्ल्यू-व्हेरीफाईड आणि एडर-एडिट आदी सर्व निकषांवर या साधनाने डीपसीप व्ही 3 या साधनाला मागे टाकले आहे, अशीही माहिती या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साधनांच्या संदर्भात देण्यात आली आहे.

Advertisement
Tags :

.